अस म्हणतात मुंबईच्या या गजबजलेल्या जगात जिथे वेळ कोणासाठी थांबत नाही हे खरंच आहे. ज्या शहरात माणूस मदत असताना पण चालू शकत नाही त्या शहरात “तिने” स्वतःला घडवल. जस झाड स्वतःहून वाढत आणि मोठं होऊन दुसर्यांना पुरवत तसच ती सुद्धा एका झाडा सारखी उभी राहिली. कष्ट करून तिने आपल्या मुलांना शिक्षण आणि संस्कारांची सावली दिली. आज आपण जाणून घेऊया “ती” ची गोष्ट जी फक्त चार भिंतींमध्ये दडलेली आहे.
माझ नाव पार्वती मी सध्या वडाळा येथे राहते. माझ्या कुटुंबात एकूण १२ सदस्य आहेत. मी माझे ३ मुलं, ३ सुना आणि ५ नातवंडे. माझ बालपण आणि शिक्षण हे गावीच झाल. माझ्या आई वडिलांना आम्ही ५ मुली होतो घरात कमवणारे वडील एकटेच होते म्हणून बालपण हे कष्टातच गेल. १४ वर्षाची झाले तेव्हा एक स्थळ आल मुलगा मुंबई काम करतो, स्वतःच घर पण आहे आणि फक्त राजा-राणीचा संसार होईल अस म्हणत वयाच्या १४ व्या वर्षी माझ लग्न झाल. लग्न करून मुंबईला आले तेव्हा डोळ्यासमोर होती एक झोपडी. पण लग्न ठरलं तेव्हा पासून शिकवण दिली होती की नवरा जसा ठेवेल तशी रहा म्हणून काही न विचारता संसाराला सुरुवात केली.
लग्नानंतर चा काही काळ सुखात गेला एक मुलगा झाला. घर आनंदाने भरलं होत पण ५ महिन्यातच नवऱ्याचं काम सुटलं. हात वर हात ठेवून बसून चालणार नव्हतं म्हणून भाड्याने एक शिलाई मशीन घेतली. दिवस घरच्या कामानं मध्ये जात होता आणि रात्र शिलाई मशीन वर. घरी राहून मित्रानं मध्ये बसून नवऱ्याच्या सवयी बिघडू लागल्या. रोज दारू पिऊन यायचे आणि पैसे मागायचे पैसे दिले नाही कि मारहाण करत.
अशीच काही वर्षे गेली अजून २ मुले झाली. खर्च अजून वाढला काही दिवसाने नवरा पण कामाला जाऊ लागला पण भाड्याची मशीन नेमकी चालणार तरी किती आणि नवीन घ्यायला एवढे पैसे नाही. एक दिवस बाजूला राहणाऱ्या दादांनी सांगितलं ३० मिनिटाच्या अंतरावर एक फॅक्टरी आहे तिथे खूप बायका येतात कामाला आणि काम जास्त कठीण नाही फक्त नळ्या आणि पापडाचे पाकीट भरायचे.मग मी तिथे कामाला लागले. ३ वर्ष फॅक्टरी मध्ये काम केल.
एक दिवस कामावर असताना मुलाचा फोन आला बाबा खाली पडलेत , ताप आहे आणि काही बोलत नाहीत . धावत पळत हॉस्पिटल मध्ये पोहचले आणि बातमी कळाली नवरा वारला. घरातल्यानी गावी परत ये याचा हट्ट केला पण अजून खूप वाईट हाल होतील हा विचार डोक्यातून जात नव्हता. घरातल्या लोकांशी वाद करून मुंबई ला राहूच निर्णय घेतला.
फॅक्टरी मध्ये काम करता करता सुचलं कि आपण स्वतःच पण काम सुरु करू शकतो. मालकाशी बोलले त्यांच्या कडून नळ्या आणि पापडाच्या मालचे ऑर्डर घेऊ लागले. घरात बसून मुलांची मदत घेऊन त्याचे छोटे पाकीट बनवले आणि ट्रेन मध्ये विकायला लागले. काही दिवस कष्टाचे जात होते तर काही दिवस चांदीचे. देवाच्या कृपेने माझी तिन्हीही मूल चांगली शिकून कामाला लागली आहेत आणि त्यांचे लग्न पण झाले आहे आणि मला गोंडस ५ नातवंड पण आहेत.
You Might Also Like
अशी तर आता काम करायची गरज नाही आहे पण वेळ कशी पण बदलते याचा अनुभव फार चांगला आहे म्हणून मी आज पण सकाळी ७ वाजता फॅक्टरी मधून माल आणते. माझ्या सुना आणि नातवंड माझी मदत करतात. दुपारी २ ते रात्री ११ परेंत मी ट्रेन मध्ये नळ्या, पापड, चिवडा विकते आणि माझी लहान सून वडाळा ब्रिज वर हेच सामान विकायला बसते.
माझ आयुष्य जस मी पार पाडलं आहे त्यावरून एकच गोष्ट सांगेल वाईट वेळ हि माणसावर कधीही येऊ शकते पण आपण त्या वाईट वेळेचा सामना कसा करतो हे आपल्यावर असत. जर आपली वेळ आणि आपले आयुष्य चांगले आहे म्हणून निवांत बसू नका. जो पर्येंत आपल्या क्षमता आहे काम करण्याची तो पर्येंत काम करा. कोणावर अवलंबून राहू नका कारण काळ आणि वेळ कधीही बदलू शकतो.
“वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण त्या काळाला हरवायचं की त्यातून शिकून मोठं व्हायचं, हे आपल्या हातात असतं!” – पार्वतीताईंच्या जीवनाचा हा सर्वात मोठा धडा आहे.