“ती” चा प्रवासात सोनं खेचण्याचा प्रयत्न झाला, पण प्रसंगावधान आणि…

माय मराठी
4 Min Read

“कष्टाच्या वाटेवर चालत राहिले,
स्वप्नं पूर्ण करायला धडपडत राहिले”.

“संकटं आली तरी न थांबले,
जिद्दीने जगायचं मी ठरवले”.

“कामाच्या गडबडीत जगणं शिकले,
आनंदाचे क्षणही हसून टिपले”.

“थोडंसं हसू, थोडीशी मजा,
जीवन जगायचंय उत्साहानं सजा”!

माझ नाव कल्पना. मी सध्या मुलुंड मध्ये घरकाम करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण ६ सदस्य आहेत मी माझे मिस्टर माझी एक मुलगी एक मुलगा आणि माझा भाऊ आणि त्याचा मुलगा.


माझ बालपण गावी गेलं आम्ही ३ भावंडं आर्थिक परिस्तिथी फारशी ठीक नसल्याने शिक्षण कमी झाले त्यानंतर माझ लग्न झालं. लग्नानंतर काही वर्ष सासऱ्याची तब्येत ठीक नसल्याने सासूंना एकटीला जमत नव्हते म्हणुन मी गावी राहिले मी सासू सासरे मुलांसोबत गावी राहायचे आणि माझे मिस्टर त्याच्या बहिणेकडे मुंबई ला राहायचे.

सासरे गव्हर्मेंट जॉब ला होते त्यामुळॆ त्यांनी त्याच्या निवृत्ती नंतर मिळविलेल्या पैश्यातून त्याचा २ मुलींना आणि २ मुलांना दिवा येथे घर घेऊन दिली होती त्यामुळे आमचं घर होत पण त्याच्या तब्येत ठीक येत नव्हते काही वर्षांनी साऱ्याचे निधन झाले मग आम्ही काही महिन्यानंतर शिक्षणासाठी आणि मिस्टरांना आर्थिक हातभार लागेल ह्या विचाराने दिव्याला यायच ठरवल.


सासूंना सवय नसल्यामुळे त्या गावीच राहिल्या आणि मी माझी मुलं थोडंफार सामान घेऊन आम्ही दिव्याला आलो आणि मिस्टरांनी थोडंफार दिव्याला पण सामान घेऊन ठेवलं होत आणि इकडे आल्यावर मुलांना शाळा पहिल्या ऍडमिशन घेतलं आणि बाकी सर्व गोष्टी करता करता १ महिना गेला.

मग मी आल्यावर मी सहा सात महिने घरीच होते कारण मी मुंबई मध्ये नवीन होते त्यामुळे मला प्रवास करणे एकटीला जमायचं नाही आणि मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी सामान्य माणसांचीही वस्ती आहे शिक्षण कमी असल्यामुळे घरकामाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला जवळपास ज्या महिला कमला जात होत्या त्यांना मी कामासाठी विचारले.

तर मला काही दिवसांनी मुलुंड मध्ये एक काम मिळाल त्यानंतर मी तिकडे जायला चालू झाली हळूहळू मला आणखी काम मिळाली गेली १० वर्षे मी घरकाम करत आहे घरातील कामाची जबाबदारी सकाळी ५ ला उठून पार पडते त्यानंतर हल्लीच्या वाढत्या गर्दीमुळे धावपळ करीत ट्रेन पकडून कामाला जाते आणि त्यानंतर संध्याकाळी ७:३०-८ वाजता घरी परतल्यावर घरातील कामं आणि जेवण करता करता रात्रीचे १२ कधी वाजतात ते कळतही नाही.

ह्या सर्व गडबडीमध्ये एक भयानक गोष्ट माझ्यासोबत घडली ती म्हणजे माझ्या नुकतंच मी मेहनत करून केलेलं माझ सोन्याचं मंगळसूत्र कोणीतरी गळ्यातून खेचण्याचा पर्येंत केला हे मला कळून आले तेव्हा मी आरडाओरडा केला आणि तेच मंगळसूत्र तुटून माझ्या ड्रेसमध्ये अडकलं ते पाहताच मी शांत झाले कारण मी खूप घाबरून गेली होती त्यातून माझ्या रोजच्या प्रवासातील झालेल्या मैत्रिणींनी आधार दिल .आणि ह्या त्याच मैत्रिणी ह्या सर्व तणावग्रस्त आणि दगदगीत एकमेकींना आधार देतो वेगवगळ्या खायच्या वस्तू नेऊन ट्रेन मध्ये विरंगुळा म्हणुन थोडी मजा करतो .

आम्ही मैत्रिणी नि ठरवलंय आहे काम करता करता जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे
वर्षातून एकदा तरी कुठेतरी फिरायला जायचं हल्लीच आम्ही माथेरान ला फिरायला गेलो होतो तिकडे आम्ही खूप मजा केली फिरलो नेलेले डब्बे खाल्ले दिवस कसा संपला कळलंच नाही

ह्यातुन मी एकच सांगेन कष्टयचे फळ मिळतेच शिक्षण कमी आहे म्हणून काम नाही मिळणार असं समजु नका जगात काम (कष्ट ) करणाऱ्याला अनेक संधी आहेत त्याचा फायदा घ्या काम मजा घेत करा जबाबदारी आहे म्हणुन करू नका त्यात तुम्ही जास्त थकून झाल जबाबदारी तर तर सर्वानाच आहे.

प्रत्येक मेहनती स्त्री साठी एक प्रेरणा “आहे—शिक्षण कमी असलं तरी कष्टाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनात पुढे जाता येतं.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more