आपण असे कायम म्हणत आलो आहोत कि एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो परंतु माझ्यामागे माझ्या वडिलांचा आणि माझ्या नवऱ्याचा हात आहे असे बोलायला मला कधी वावगं वाटलं नाही. वडील BTT मध्ये असल्याने लहानपणापासूनच अस्सल मुंबईची लाईफ मला जगायला मिळाली.
नव्वदच्या शतकामध्ये देखील एवढा मनमोकळा बाप आपल्या पाठीशी कणखर उभा असणं म्हणजे भाग्यच. मुलींनी धाडशी कस रहायचं, शहरात राहून हि गावाच्या कामात कस चपळ राहायचं, घरात मुलं असूनहि घरातील पैश्यांचे व्यवहार माझ्याहाती सोपवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाआधी मुलींनी चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे सगळं शिकवणारे म्हणजे माझे बापू (वडील) आज ज्या काय जिद्दीने मी माझ्या मुलांना शिकवले आणि आज जी मी स्वतः खंबीरवपणे माझ्यापायावर उभी आहे ते केवळ वडिलांमुळेच.
अगदी माझ्या तारुण्य काळात वडिलांचे छप्पर डोक्यावरून गेले. घरात लहान भाऊ, बहीण आणि आई असल्याने लवकरच कामासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली.लहानपणापासून डॉक्टर बनायचं स्वप्न होतं पण घरच्या जबाबदारीने तिथं परेंत पोहचणे काय शक्य झाले नाही. अशा वेळी गजरा विकणे, भाजी विकणे, नारळ विकणे अशा गोष्टींपासून सुरुवात करून हळू हळू एका डॉक्टरकडे हेल्पर म्हणून काम करू लागले. नंतर लहान बहीण देखील शिक्षण करून चपाती लाटण्यासाठी एका घरी जाऊ लागली. ज्या डॉक्टरांकडे मी कामाला जात होते ते माझ्या वडिलांचेच मित्र असल्यानी त्यांनी मला त्यातील पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
NURSING चा कोर्से पूर्ण केला. वडील गेल्याच्या थोड्याच काळात माझं लग्न देखील झालं. एका मुलीच्या लग्नात तिचे वडील नसणे हे तिच्यासाठी एक दुर्भाग्यच आणि हा क्षण देखील मी माझ्या आयुष्यात अनुभवला. ज्या घरामध्ये वडिलांचे छप्पर नसते त्या घराकडे त्या घरातील महिलांकडे,मुलींकडे माणसांचा, नातेवाईकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. तीळ तीळ जोडून माझ्या आई ने माझं लग्न एका चांगल्या घरात लावून दिले.
लग्न झाल्यानंतर हि सुरुवातीचे दिवस जरा चढ उतारीचेच होते. पण लहापानापासून ज्या मुलीने असे दिवस बघितले आहेत तर तिला त्या दिवसांमधून मार्ग कसा काढायचा हे मला माहित होत. परिस्थीला न डगमगता चिकाटीने नवऱ्यासोबत उभी राहिली. माझ्या NURSING च्या कोर्से मी कामाला देखील पुन्हा रुजू झाली. काही काळातच मी प्रेग्नेंट राहिले अशा वेळी असं वाटत होत. माझ्या लेकरासाठी मला थोडा रेस्ट घेणं गरजेचे आहे पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.
PREGNENCY नंतरचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी असं देखील मनात विचार येयचा पण आई झालेल्या विचारांनी कधीच हे धाडस माझ्याच्यानी झाले नाही. काही काळानी परिस्थिती सुधारली. घरातलं वातावरण आनंदमय झाले. आज पाठिवळून पहिले तर असं वाटत जर मी तेव्हाच थांबले असते किंवा तेव्हाच माझ्या जीवाचं बर वाईट केलं असत. तर आज हे सुखाचे क्षण माझ्या वाटी आले नसते.
आज मी संजीवन ह्या हॉस्पिटल ला सिनियर इन्चार्गे म्हणून कार्यकारत आहे. काम करून जवळ जवळ २५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला. आज माझा मुलगा इंजिनियर तर मुलगी डबल ग्रॅज्युएट आहे. पण अभिमानाने सांगायचं झालं तर एवढंच सांगेन आपल्या आयुष्यात अनेक असे प्रसंग येतील जिथे आपण खचून जाऊ, कोणाची तरी गरज भासेल अशा वेळी फक्त आपल्या कामावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेऊन जगत राहायचं. असे जगात असताना आपली भूमिका हि अशी ठेवायची कि आपल्या चारित्र्यावर कोणी चकार शब्द काढला नाही काढला पाहिजे. ताठ मानेने जागा आणि उंच भरारी घ्या.
आयुष्याने कितीही कठीण परीक्षा घेतली, तरी हरायचं नाही, थांबायचं नाही, आणि परिस्थितीसमोर झुकायचं नाही, हे मी लहानपणापासून शिकले. वडिलांच्या शिकवणीने आणि नवऱ्याच्या पाठिंब्याने मी स्वतःला घडवलं, जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि स्वतःच्या पायावर उभी राहिले.
आज मागे वळून पाहताना कळतं की, प्रत्येक संकटाला तोंड देऊन, प्रामाणिकपणे मेहनत घेतल्यास आयुष्य आपल्याला नक्की संधी देतं. जिथे कुणीही साथ द्यायला तयार नव्हतं, तिथे मी स्वतःला उभं केलं आणि आज माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या समाजासाठी एक उदाहरण ठरले आहे.
“ताठ मानेने जगायचं आणि आयुष्याच्या प्रत्येक आव्हानाला एक संधी मानून उंच भरारी घ्यायची!” हेच मी शिकले आणि हेच सांगू इच्छिते.