डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील मोठागाव सत्संग सभागृहाच्या बाजूला असलेल्या चाळीतील एका घराला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. हि घटना बुधवार 22 तारखेला सकाळच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एका बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. घरात आग लागली असताना सुदैवाने घरात कुणीही सदस्य नव्हते.