Mumbai: जाड्या म्हणत चिडवल्यामुळे मित्रावर केला चाकूने हल्ला

माय मराठी
1 Min Read

Mumbai: जाड्या म्हणत चिडवल्यामुळे चिडलेल्या एका मुलाने १५ वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ॲन्टॉप हिल पोलीस करत आहेत.

तक्रारदार मुलाने आपल्या परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या ओळखीच्या मुलाला “जाड्या” म्हणून हाक मारली होती. गुरुवारी रात्री ॲन्टॉप हिल येथील सेक्टर ७मधील गार्डनमध्ये तक्रारदार मुलगा उभा असताना आरोपी आणि त्याचा साथीदार तेथे आले. “मला जाड्या का म्हटले?” असे विचारून त्यांनी वाद सुरू केला. शिवीगाळ झाल्यानंतर आरोपीच्या साथीदाराने तक्रारदार मुलाचे हात पकडले, आणि आरोपीने कंबरेला लावलेला चाकू काढून त्याच्यावर वार केला.

या हल्ल्यात मुलाच्या छातीला गंभीर दुखापत झाली, आणि तो खाली कोसळला. सध्या तरी जखमी झालेल्या मुलाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी जखमी मुलाचा जबाब नोंदवला, ज्यामध्ये त्याने १५ आणि १६ वर्षांच्या दोन मुलांनी आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी या दोन्ही मुलांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more