ठाणे ऑनलाईन जंगली रमीचा नादात एका तरुणानं चोरीचा मार्ग (Crime) निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या चोरट्या तरुणाकडून रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पुणे जिल्ह्यातील चाकण मधून अटक केली आहे योगेश निवास चव्हाण असे अटक चोरट्याचं नाव असून रेल्वे पोलीस पथकानं त्याच्याकडून ७ लाख ७ हजाराचे दागिने हस्तगस्त करून जप्त केल्याची माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखाचे वरिष्ठ पो. निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर मध्ये राहणारे तक्रारदार राहुल सुहास सोनी, (वय 33 ) हे ६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सोलापुर रेल्वे स्टेशन येथुन सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापुर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा कुटूंबासह प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या आईची शोल्टरपर्स दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेवर ठेऊन माढा ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान झोपुन प्रवास करीत असतांना ट्रे वरील पर्स आतील सोन्याच्या दागीन्यासह कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन लंपास केल्याची कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सोनी यांनी गुन्हा दाखल केला होता
दाखल गुन्हयाच्या आधारे कल्याण रेल्वे पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला असता माढा रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानक दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटा योगेश हा संशयित रित्या हालचाली करत असल्याचा दिसून आला त्या आधारावर त्याची ओळख पटवून त्याचा ठावठिकाणा पोलिसांना शोधून काढला. दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बॅग आणि पर्स लंपास केल्याचे समोर आले त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाख ७ हजाराचे दागिने जप्त केले आहे तसेच अधिक तपासात आरोपी योगेश चव्हाण याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद आहे. तो चोरीचे दागीने विकुन मिळालेले सर्व पैसे तो जंगली रमीमध्ये हारला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, यांनी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास रविंद्र ठाकुर करीत असल्याचेही सांगितले