Grey Divorce : हिंदू संस्कृतीत, पुराणांमध्ये विवाह एक पवित्र बंधन म्हणून मानलं गेलंय. त्यामुळे बऱ्याच काळापर्यंत घटस्फोट ही संकल्पनाच समाजात मान्य नव्हती. किंवा घटस्फोट घेणे सोपे नव्हते. आता मात्र परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. ह्यात घटस्फोटाची कारणं देखील बदलत्या काळानुसार बदलू लागली आहेत. सध्या डिवोर्स हि गोष्ट फार साधारण झाली आहे. त्यातच भारतात नवीन शब्द प्रचलित होऊ लागला तो म्हणजे ग्रे डिवोर्स.
ग्रे डिवोर्स म्हणजे काय?
काही लोकांना माहित असावा किंवा काहींना ह्याची कल्पना ही नसेल, कोणाच्या ऐकण्यात आणि कोणाच्या वाचनात आला असावा. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर परदेशात हा शब्द खूप प्रसिद्ध झाला होता, जेव्हा बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी डिवोर्स घेतला.
अलीकडेच आपण पाहिलं तर बॉलीवूडमध्ये देखील ‘ग्रे डिवोर्स’ ची कन्सेप्ट जास्त प्रसिद्ध झाली. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरअभिषेक आणि ऐश्वर्या डिवोर्स घेणार अशी बातमी वाचताना ग्रे डिवोर्स चा उल्लेख पहिला असेल. जेव्हा हा शब्द आपल्या कानावर वारंवार येऊ लागला तेव्हा एक उत्सुक्ता मनात सुरु झाली, नेमका हा प्रकार आहे तरी काय?
ग्रे डिवोर्स म्हणजे जी जोडपी बऱ्याच वर्षानंतर किंवा पन्नाशी नंतरही वेगळं होण्याचा विचार करतात. कारण याच वयामध्ये केसांना जो पांढरा रंग येतो आणि हे घटस्फोट इतर प्रकारच्या घटस्फोटांपेक्षा जास्त अवघड होऊ शकतात या वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी “ग्रे घटस्फोट” हा शब्द वापरला गेला. भारतात सुद्धा ग्रे डिवोर्स आजकाल प्रचलित होऊ लागलाय. पण हा प्रकार जुनाच आहे. कारण बॉलिवूडमध्ये ह्याची काही उदाहरणे दिसून येतात.
ग्रे डिवोर्स च्या मागची कारणे :
१. नात्याची गरज संपणे – ह्यात नात्याची गरज संपल्याचे भासवतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे दोन्ही व्यक्ती नातं संपवतात.
२. निवृत्ती नंतरची जीवनशैली – निवृत्तीनंतर बऱ्याच वर्षांची सोबत नकोशी वाटून नवीन भावनेची जाणीव जोडप्यात निर्माण होते.
४. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप – नवीन व्यक्तीच्या किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सोबतीमुळे नात्यात दुरावा येतो. बऱ्याच वर्षांच्या सोबतीचा कंटाळा येतो.
५. बदलणारे विचार आणि आवड – सोशल मीडिया आणि अनेक नवनवीन गोष्टींमुळे बदलले जाणारे विचार आणि आवड ह्याचा परिणाम नात्यात दिसून येतो.
कायदा काय सांगतो?
ग्रे डिवोर्स साठी कोणताही वेगळा असा कायदा भारतात नाहीये. यासाठी हिंदू विवाह कायदा १३ ग्राउंड आणि १३ बी मध्ये mutual कन्सेप्ट डिवोर्स आहे. तसेच मुस्लिम law मध्ये तलाक हसन तलाक, एहसान खुला कन्सेप्ट, मुबारत कन्सेप्ट, हेच act आहेत.
ग्रे डिवोर्स आव्हाने कोणती आहेत?
१. ग्रे डिवोर्स नंतर आरोग्य विम्याची विभागणी कशी करायची याचा विचार करावा लागतो.
२. कुटुंबाची होणारी भावनिक तळमळ अनुभवावी लागते.
३. जोडप्यांकडे अनेकदा जास्त संपत्ती असते, ज्यामुळे गुंतवणूक, बजेट आणि सेवानिवृत्ती निधीवर मतभेद होऊ शकतात.
४. ज्या वृद्ध जोडप्यांनी त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी योजना आखली नाही त्यांना डिवोर्स नंतर स्वत:ला आधार देण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
ग्रे डिवोर्स मध्ये सुप्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश –
You Might Also Like
१. हृतिक रोशन आणि सुझैन खान
या जोडप्याने २००० मध्ये लग्न केले आणि १४ वर्षांच्या लग्नानंतर २०१४ मध्ये डिवोर्स घेतला. ते फक्त मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येताना दिसतात.
२. आमिर खान आणि किरण राव
या जोडप्याने १५ वर्षांहून अधिककाळ लग्न केल्यानंतर जुलै २०२१ मध्ये डिवोर्सची घोषणा केली.
३. A R रेहमान आणि सायरा बानू यांनी लग्नाच्या २९ वर्षानंतर ग्रे डिवोर्स घेतला.
अशी उदाहरणे बघता आपल्या भारतामध्ये देखील ग्रे डिवोर्स हि कन्सेप्ट प्रचलित झालेली आहे.