MIDC: एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती; कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही

माय मराठी
1 Min Read

MIDC: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणी पुरवठा शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तास पाणी कमी दाबाने येईल, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

सध्या ठाणे शहराला दररोज ५८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. यातील १३५ दशलक्ष लीटर पाणी कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाला पुरवले जाते, जे शुक्रवारच्या दुरुस्तीमुळे प्रभावित होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कटाई नाका ते मुकुंद दरम्यानच्या जलवाहिनीवर तातडीचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणी पुरवठा गुरुवार, ६ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ७ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २४ तास बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तास पाणी कमी दाबाने येईल. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more