Home Loan : लोन कालावधी लांबवण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहितेय का?

माय मराठी
2 Min Read

Home Loan : तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक अडी अडचणी येत असतात आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक गरज भासू शकते, आणि त्यावर एक मार्ग म्हणजे लोन काढणे.
घरामध्ये अचानक येणारे खर्च असो वा आणखी काही आपण कोणाला पैसे मागण्यापेक्षा लोन घेणे जास्त प्रेफर करतो. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार लोन परतफेड करण्याची काळजी घेत असतो. काहीवेळा लोन चा कालावधी लंबवण्याचा निर्णय घेतला जातो. पण याचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात. चला, या विषयावर सविस्तर चर्चा करूयात…

लोनचा कालावधी लांबवण्याचे फायदे –

कमी मासिक हप्ता –
मासिक हप्ता कमी ठेवल्याने तुम्हाला लोन परतफेडीसाठी पुरेसा वेळ मिळाला जातो. आणि यामुळे तुमच्या घरगुती खर्चांवरही फारसा असा बदल होत नाही. मासिक हप्त्याची रक्कम कमी असल्याने तुम्हाला इतर गोष्टींच्या खर्चांकडेहि लक्ष देणे शक्य होते.

आर्थिक ताण कमी होतो –
हप्त्यांची रक्कम कमी ठेवल्याने घरगुती खर्च करत असताना कोणताही आर्थिक ताण येत नाही. तुम्ही तुमच्या सोयी नुसार मासिक हप्ता ठरवलेला असतो त्यामुळे तुम्हाला त्याचे गणित समजून इतर खर्चांकडे हि पैसे गुंतवता येतात.

जास्त वेळ मिळतो –
लोनचा कालावधी वाढवून, तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. यामुळे तुमचे आर्थिक बजेट विस्कळीत होत नाही. आणि परतफेडीची वेळ जास्त असल्याने कोणत्याही प्रकारचे ओझे तुमच्या डोक्यावर राहत नाही.

लोनचा कालावधी लांबवण्याचे तोटे –

व्याज जास्त प्रमाणात भरावे लागेल –
लोनचा कालावधी वाढविल्यामुळे एकूण व्याज जास्त होईल. तुम्ही जास्त काळापर्यंत कर्ज फेडत राहिल्यात तर एकूण व्याजाची रक्कम जास्त होते. यामुळे लोन पूर्णपणे फेडण्यासाठी जास्त पैसे खर्च होऊ शकतात.

जास्त काळासाठी लोनचा ताण –
तुम्ही लोन परतफेडीसाठी जेवढा काळ वाढवाल तेवढाच ताण तुम्हाला इतर खर्च करताना जाणवणार आहे. यामुळे तुम्हाला नवे आर्थिक निर्णय घेणं किंवा नवीन लोन घेणं कठीण होऊ शकते.

कर्ज मुक्त होण्यास वेळ लागेल –
लोनच्या कालावधीला लांबवून, तुम्हाला कर्ज मुक्त होण्यासाठी जास्त वेळ लागेल. यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं कठीण होईल.
कोणत्याही गोष्टीसाठी खर्च करताना तुम्हाला सर्वात आधी हप्त्याचा विचार करावा लागेल.

लोनचा कालावधी लांबवण्याचा निर्णय घेताना त्याचे फायदे आणि तोटे दोन्हींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तात्काळ आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, तर कालावधी लांबवणे फायदेशीर ठरू शकत नाही. पण, सगळ्याबाजू लक्षात घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more