स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते,पण वाढत्या घरांच्या किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण ठरते. मात्र, सरकार अनेक योजनांच्या (Government Schemes) माध्यमातून मोफत किंवा कमी किमतीत घरे उपलब्ध करून देत आहे. जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल,तर या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना,क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना,MHADA लॉटरी योजना यांसारख्या अनेक योजनांचा समावेश आहे.या योजनांद्वारे पात्र नागरिकांना घरासाठी सरकारकडून थेट आर्थिक मदत,कमी व्याजदरात कर्ज किंवा मोफत घरे मिळू शकतात.चला,अशा ५ मोठ्या सरकारी योजनांबद्दल माहिती घेऊया,ज्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी उपयुक्त आहेत.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY):-
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) ही गावात राहणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत घरे दिली जातात.या योजनेचे फायदे म्हणजे गरीब नागरिकांसाठी नवीन घरे, ₹२ लाखांपर्यंत गृहकर्जावर ३% व्याज सवलत आणि २०२२ पर्यंत “सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट. या योजनेसाठी पात्र असलेले नागरिक म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही,ज्या कुटुंबांचे उत्पन्न ठराविक मर्यादेत आहे आणि ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे आहेत.
क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना (CLSS):-
क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना (CLSS) ही योजना खास घर घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी आहे.जर तुम्हाला गृहकर्ज घ्यायचे असेल, पण जास्त व्याजदरामुळे अडचण येत असेल,तर ही योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत ₹२.६७ लाखांपर्यंत गृहकर्ज व्याज सबसिडी,कमी हफ्त्यावर घर घेण्याची संधी आणि ICICI, SBI आणि इतर बँकांद्वारे उपलब्धता आहे.निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिक आणि पहिल्यांदाच घर खरेदी करणारे लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
राजीव गांधी आवास योजना:-
राजीव गांधी आवास योजना ही केंद्र सरकारने झोपडपट्ट्या हटवून गरिबांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली होती.या योजनेचे फायदे म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना,गरीब कुटुंबांसाठी स्थायी घरे आणि मूलभूत सुविधा (पाणी,वीज,शौचालय) उपलब्ध करून देणे.झोपडपट्टीत राहणारे गरीब लोक आणि ज्यांच्याकडे राहण्यासाठी दुसरे कोणतेही घर नाही,ते या योजनेसाठी पात्र आहेत.
MHADA लॉटरी योजना:-
MHADA लॉटरी योजना (महाराष्ट्र सरकार) ही महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) द्वारा सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना कमी किमतीत घरे दिली जातात.यामध्ये आर्थिक दुर्बल गट (EWS) आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे, कमी किमतीत घर खरेदीची संधी आणि सरकारी नियंत्रणाखालील सुरक्षित व्यवहार यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत आहे,ते या योजनेसाठी पात्र आहेत.
DDA हाउसिंग योजना:-
DDA हाउसिंग योजना (दिल्ली सरकार) ही दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) ने विविध उत्पन्न गटांसाठी स्वस्त घर योजना सुरू केली आहे.या योजनेचे फायदे म्हणजे ₹११ लाखांपासून सुरू होणारी घरे,उच्च, मध्यम आणि निम्न उत्पन्न गटासाठी घरे आणि दिल्लीतील नागरिकांसाठी उत्तम संधी.दिल्लीतील रहिवासी आणि गरीब व मध्यमवर्गीय लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
घर घेण्यासाठी अर्ज कसा करावा? या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही संबंधित सरकारी वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक डिटेल्स आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.काही योजनांसाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.प्रत्येक योजनेचे नियम आणि अटी वेगवेगळ्या आहेत,त्यामुळे अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट द्या आणि संपूर्ण माहिती मिळवा.
जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल,पण बजेट कमी असेल, तर सरकारच्या या योजनांचा फायदा घ्या! या योजनांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त दरात घर मिळू शकते. तुमच्या स्वप्नातील घरासाठी योग्य योजना निवडा आणि आजच अर्ज करा!