Daily Routine: सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी केल्यास दिवस नक्कीच चांगला जाईल

माय मराठी
2 Min Read

सध्याचं जीवन हे अतिशय धावपळीचं झालं आहे, त्यामुळे किती काही चांगल्या गोष्टी माहीत असल्या, पटत असल्या तरीदेखील ते करायला आजकाल कोणाकडे वेळ (Daily Routine) नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर काही शुभ गोष्टी केल्यास दिवस चांगला आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यावर शक्य त्यांनी या गोष्टी कराव्यात किंवा आपल्या मुलांना नवीन पिढीला याचा प्रत्यय नक्कीच द्यावा.

हात पाहणे (करदर्शन)

  • झोपेतून उठताच सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे.
  • असे म्हणतात की हाताच्या तळव्यांमध्ये देवी लक्ष्मी (संपत्ती), सरस्वती (विद्या) आणि भगवान विष्णू (शक्ती) वास करतात.
  • म्हणून हात पाहून मनात प्रार्थना करावी:
    “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती | करमूले तू गोविंदः प्रभाते करदर्शनम् ||

    पाय जमिनीला टेकवण्यापूर्वी पृथ्वीला वंदन करणे
  • जमिनीला पाय टेकण्याआधी, पृथ्वीमातेची क्षमा मागून वंदन करावे.
  • हे म्हणावे:
    “समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमंडले | विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे ||”

स्वच्छ पाणी प्यावे

  • सकाळी उठताच एक ग्लास तांब्यातील किंवा मातीच्या भांड्यातील पाणी प्यावे.
  • यामुळे शरीर शुद्ध होते आणि पचनसंस्था सुधारते.

सूर्याचे स्मरण व सूर्यनमस्कार

  • सूर्य नारायणाला मनोमन वंदन करून, त्यांच्या किरणांची ऊर्जा ग्रहण करावी.
  • शक्य असल्यास सूर्यनमस्कार घालावेत आणि “ॐ सूर्याय नमः” मंत्राचा जप करावा.

गायत्री मंत्र किंवा इतर शुभ मंत्र जप

  • दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करण्यासाठी गायत्री मंत्र, महा मृत्युंजय मंत्र किंवा इतर शुभ मंत्रांचा जप करावा.
  • गायत्री मंत्र:
    “ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं | भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ||”

    स्नान करून देवपूजा व प्रार्थना
  • घरातील देवस्थानात जाऊन दिवा लावावा आणि पूजा करावी.
  • सकाळच्या प्रार्थनेने मनःशांती मिळते आणि दिवस सकारात्मकतेने सुरू होतो.

आई-वडिलांचे आशीर्वाद घेणे

  • सकाळी उठल्यावर आई-वडिलांचे किंवा घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्याने दिवस शुभ आणि यशस्वी होतो.

सकारात्मक संकल्प करणे

  • दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी.
  • स्वतःला एक सकारात्मक संकल्प द्यावा, जसे की “आजचा दिवस शुभ असेल, मी आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.”

ही काही ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी केल्या जाणाऱ्या शुभ गोष्टी आहेत. या सवयी अंगीकारल्यास जीवन अधिक सुखी, समृद्ध आणि शांततापूर्ण होऊ शकते. तुम्हाला ही माहिती आवडली अथवा पटली असण्यास नक्की इतरांना पाठवा.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more