Water in Plastic Bottle:प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिताय सावध व्हा;‘या’ तीन गंभीर आजाराचा धोका ओळखा

माय मराठी
3 Min Read

आपल्या दैनंदिन जीवनाचा प्लॅस्टिकचा वापर अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. किचनमधील वस्तूंपासून पाण्याच्या बाटलीपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान (Water in Plastic Bottle) होत आहे. आरोग्याचेही नुकसान होत आहे. सरकारकडूनही नागरिकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. असे असताना सुद्धा प्लॅस्टिकचा वापर सर्रास केला जात आहे.

प्लॅस्टिकचा बाटलीत पाणी पिणे तर अगदी कॉमन झाले आहे. पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रास वापरल्या जात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या प्लॅस्टिकचा बॉटलमध्ये पाणी पित आहात त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकचा बॉटलपासून फ्लोराइड, आर्सेनिक आणि बीपीए यांसारखे धोकादायक रसायने निघतात. यामुळे कॅन्सर, मधुमेह आणि कमकुवत रोग प्रतिकारशक्ती यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

चला तर मग जाणून घेऊ की प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिल्याने काय काय समस्या होऊ शकतात आणि यांपासून सुरक्षित रहायचे असेल तर काय करता येईल.

प्लॅस्टिकमध्ये असणारे धोकादायक रसायने यांव्यतिरिक्त प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी ठेवले तर फ्लोराइड, आर्सेनिक आणि अ‍ॅल्युमिनियम यांसारखे हानिकारक पदार्थ निघतात. मानवी शरीरासाठी हे पदार्थ अत्यंत घातक ठरू शकतात. म्हणून प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिणे म्हणजे स्लो पॉइजन पिण्यासारखे आहे. यामुळे हळूहळू तुमचे आरोग्य खराब होत जाईल.

डायऑक्सिनचे उत्पादन

उष्ण वातावरणात प्लास्टिक वितळू लागते. परंतु आपण वाहन चालवत असताना नेहमी प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी भरून ठेवतो. कधी कधी ही पाण्याची बाटली कारमध्येच ठेवून देतो. हीच पाण्याची बाटली सूर्याच्या संपर्कात येते. बाटली गरम झाल्याने त्यातून डायऑक्सिन नामक पदार्थ निघतो. असे पाणी पिल्याने स्तन कॅन्सर होण्याचा धोका असतो.

मधुमेह

बिस्फेनॉल ए नावाचे एक औद्योगिक रसायन आहे ज्याचा उपयोग प्लॅस्टिक तयार करण्यासाठी केला जातो. या केमिकलमुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि प्रजननासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे शक्यतो टाळा.

व्हिटॅमिन युक्त पाणी

आजकाल पिण्याचे पाणी प्लॅस्टिकच्याच बॉटलमध्ये मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या या पाण्याचे आरोग्य लाभ वाढवण्यासाठी यामध्ये व्हिटॅमिन मिसळतात. परंतु हा प्रकार आणखी खराब आहे. करण यात रंग आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप यांसारखे आरोग्यास हानिकारक योजक असतात.

कमकुवत इम्युनिटी

प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिल्याने शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीवर अत्यंत वाईट परिणाम होतो. प्लॅस्टिकच्या बाटलीद्वारे निघणारे हानिकारक केमिकल शरीरात प्रवेश करून शरीराला अनेक नुकसान करू शकतात. तसेच शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीला देखील कमकुवत करू शकतात.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more