मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री नितेश राणे यांचे आभार
( शंकर जाधव )
अधिवेशनात कोकण रेल्वेच्या ( Kokan Railway) दुरावस्था,चाकरमान्यांचे होणारे हाल आणि रेल्वे विकासासाठी भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण या गोष्टीची गंभीरता लक्षात घ्यावे याकरिता 8 फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्रालय, दिल्ली नंतर अध्यक्ष तानाजी परब आणि महासचिव डॉ.अमित अनंत दुखंडे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विनंती अर्ज केला होता. 19 मार्च अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या कोकण रेल्वे विषयी आपुलकी आणि पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे ऋणी असल्याचे अध्यक्ष परब यांनी सांगितले.
अनेक वर्ष अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती आणि अखिल कोकण विकास महासंघ देत असलेला अविरत असा लढा सुरु आहे. अध्यक्ष परब आणि डॉ.दुखंडे यांनी मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांन विनंती निवेदन दिले होते.. विलिनीकरण ही बाब त्वरित मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडून याबाबत प्रस्ताव अधिवेशनात मांडण्यात यावा त्याकरिता मंत्री नितेश राणे यांनी दाखवलेला विश्वास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पुढाकाराने ह्या विनंतीला त्यांनी दिलेला मान आमच्या संघटनेच्या कमिटीस जो विश्वास मिळाला याबद्दल आभारी असल्याचे परब यांनी सांगितले.
कोकण विकास महासंघाने दिल्ली येथे फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे मंत्रालय अश्विन वैष्णव यांना दिलेले निवेदन व मंगळवार 18 मार्च रोजी आपल्या महासंघाच्या निवेदना नंतर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलनीकरण करण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक राज्यांनी संमती दिली आहे. महाराष्ट्राने केंद्र सरकारला विलनीकरणासाठी होकार कळवावा अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिल्ली येथे दिली होती. त्या बद्दल सविस्तर मांडणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला ते उत्तर देत होते.कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण केल्यानंतर ‘कोकण रेल्वे’ हेच नाव राहील.मात्र भारतीय रेल्वे गुंतवणूक करून निधी उपलब्ध करून देईल या माध्यमातून दुहेरीकरणासारखी अनेक कामे केली जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
You Might Also Like
जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेली “अखिल कोकण विकास महासंघ आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती चा हा मोठा विजय आहे. कोकणच्या न्याय हक्कासाठी एवढ्या वर्षांचा लढा आणि विकासासाठी आमचा दृढ विश्वास, आज खऱ्या अर्थाने आपल्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रहिवासी, सर्व प्रवासी आणि कोकण भुमी पुत्रांच्या भविष्यासाठी यशदायी ठरला असे डॉ. दुखंडे यांनी सांगितले.