IPL म्हणजे केवळ क्रिकेट (IPL 2025) नाही, तर मनोरंजन आणि ग्लॅमरचा धमाका देखील आहे. गेल्या दोन दशकांपासून हा T20 लीग (IPL 2025) भारतीय सिनेसृष्टीच्या चमकदार दुनियेशी जोडलेला आहे. क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा प्रेक्षक दीर्घेत, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठमोठ्या स्टार्सची हजेरी IPL च्या खासियतपैकी एक आहे. आणि त्यातील सर्वात मोठा आकर्षण असतो उद्घाटन सोहळा – जिथे स्टार कलाकार मैदानावर धुमाकूळ घालण्याआधीच मंचावर धमाल करतात.
या वर्षीचा IPL उद्घाटन सोहळा क्रिकेटच्या पवित्र स्थळी, कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडणार आहे. शनिवार, 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा सुरू होईल आणि त्यानंतर तासाभराने पहिले सामन्याचा टॉस होईल. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील रोमांचक सामना हंगामाची शानदार सुरुवात करेल. विशेष म्हणजे, विराट कोहलीसारखा सुपरस्टार खेळाडूही पहिल्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे.
KL राहुल IPL 2025 च्या पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, जाणून घ्या कारण
यंदाच्या IPL उद्घाटन सोहळ्यात काही मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. आतापर्यंत श्रेया घोषाल, दिशा पटानी, आणि पंजाबी रॅपर करण औजला यांची नावे निश्चित झाली आहेत. ही तिघेही त्यांच्या दमदार परफॉर्मन्सने वातावरण तापवणार आहेत.
ईडन गार्डन्स हे शाहरुख खानच्या KKR संघाचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे IPL च्या या रंगारंग सोहळ्यात “बादशाह” शाहरुख खान हजेरी लावेल का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याशिवाय, वरुण धवन आणि श्रद्धा कपूर देखील परफॉर्म करू शकतात, अशी चर्चा आहे. केवळ भारतीय कलाकारच नाही, तर या IPL सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय बँड OneRepublic देखील परफॉर्म करण्याची शक्यता आहे. त्यांनी अलीकडेच करण औजलासोबत ‘Tell Me’ हे गाणं प्रदर्शित केलं असून, त्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिशाही झळकली आहे. त्यामुळे त्यांचा IPL मध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे.
पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट, IMD ने काय सांगितले?
You Might Also Like
अजून टॉस उडालेला नाही, अजून पहिला चेंडू टाकलेला नाही, तरीही या धमाकेदार उद्घाटन सोहळ्याने IPL 2025 ची रंगत वाढवली आहे! कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर क्रिकेट आणि मनोरंजनाच्या संगमाचा आनंद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत