तुम्ही अजूनही नवीन PAN card घेतलं नाही का?चिंता करू नका, अशा पद्धतीने करा अर्ज

माय मराठी
2 Min Read

भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडे काही महत्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. या कागदपत्रांची आवश्यकता महत्वाच्या कामांसाठी पडते. बऱ्याचदा काम अडूनही पडते. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मतदार कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड (PAN card) यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे भारतात राहणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. यात पॅनकार्ड जास्त महत्वाचे आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल तर त्याची अनेक महत्वाची कामे खोळंबू शकतात.

मागील वर्षात भारत सरकारने पॅनकार्डच्या स्वरुपात महत्वाचा बदल केला आहे. सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गतच पॅनकार्ड जारी केले जातील. जुने पॅनकार्ड देखील बदलण्यात येत आहेत. जर तु्म्हाला नवीन पॅनकार्ड मिळाले नसेल तर यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. स्वतः केंद्र सरकार PAN 2.0 थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. यासाठी तुमच्याकडून कोणते चार्जेस देखील घेतले जाणार नाहीत.

कोणाला मालमत्ता गिफ्ट करत आहात थांबा ‘त्या’ आधी हा नियम जाणून घ्या

केंद्र सरकारद्वारे जारी करण्यात येणारे PAN 2.0 कार्ड हे पूर्वीच्या PAN 1.0 ची जागा घेणार आहे. नव्या PAN 2.0 मध्ये क्यूआर कोडचा समावेश असून, यामुळे कार्डची सुरक्षितता आणखी हायटेक झाली आहे.

जर तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलेले नसेल तर काळजी करू नका. यासाठी तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या एखाद्या पॅन सर्व्हिस सेंटरमध्ये जा. याठिकाणी तुम्ही नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागेल. मोबाइल व्हेरिफिकेशन करावे लागेल. आधारकार्ड नंबर द्यावा लागेल. तसेच काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच नाममात्र शुल्क द्यावे लागेल.

वाहनचालकांच्या खिशाला कात्री! समृद्धी महामार्गावर टोलवाढ

तुम्ही नवीन पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan या पोर्टलला भेट देऊन सहज अर्ज भरता येईल.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more