आज देशातील करोडो लोक घरी बसून यूपीआयच्या (UPI) मार्फत व्यवहार करताना दिसत आहे. मात्र आता आरबीआयने (RBI) यूपीआयबाबात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आता एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) बँकांशी सल्लामसलत करुन व्यवसाय व्यवहारांसाठी (Person-to-Merchant म्हणजेच पी2एम आणि Merchant-to-Merchant म्हणजेच एम2एम) यूपीआय मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकणार आहे.
याचा अर्थ असा की आता बाजाराच्या गरजेनुसार पी2एम आणि एम2एम व्यवहारांची मर्यादा वेळोवेळी एनपीसीआयला (NPCI) बदलता येणार आहे. मात्र P2P म्हणजेच पर्सन टू पर्सन व्यवहारांसाठी 1 लाखाची मर्यादा तशीच राहणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
तर आरबीआयने घेतलेल्या या निर्णयानंतर आता एनपीसीआय या व्यवसाय व्यवहारांची मर्यादा P2M आणि M2M साठी 2 लाख किंवा 5 लाखांपर्यंत वाढवू शकतो.
सध्याची UPI मर्यादा किती आहे?
व्यवहार प्रकार विद्यमान मर्यादा
Person-to-Person (P2P) : 1 लाख (कोणताही बदल नाही)
You Might Also Like
Person-to-Merchant (P2M) : 1 लाख (सध्या)
Merchant-to-Merchant (M2M) : 1 लाख (सध्या)
या निर्णयाचा व्यावसायिकांवर काय परिणाम होणार ?
आरबीआयच्या या निर्णयानंतर याचा दुकानदार, ऑनलाइन व्यवसाय आणि लहान व्यापाऱ्यांना मोठे व्यवहार सहजपणे करण्याची संधी मिळणार असल्याने याचा फायदा व्यवसायिकांना होणार आहे. तसेच या निर्णयानंतर जास्त डिजिटल पेमेंट्स होण्याची शक्यता असल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
मोठ्या व्यवहारांची सुविधा
या निर्णयानंतर आता महागड्या खरेदीत (जसे की दागिने, इलेक्ट्रॉनिक्स) देखील UPI द्वारे मोठ्या प्रमाणात पेमेंट करणे शक्य होणार आहे. मात्र लोकांमध्ये पैसे पाठवण्याची मर्यादा (P2P) फक्त 1 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. तर या निर्णयानंतर मोठे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करावे लागणार आहे.