एक खास सुविधा मुकेश अंबानीच्या जिओ (JIO) फायनान्स कंपनीने सुरू केली आहे. आता तु्म्ही तुमच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड गहाण ठेऊन कर्ज घेऊ शकता. ही सुविधा जिओ फायनान्स अपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सर्व प्रक्रिया डिजीटल राहणार आहे.
विशेष म्हणजे, तुम्हाला फक्त दहा मिनिटांत कर्ज मिळेल. 9.99 टक्के व्याजदराने एक कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. कर्ज फेडीसाठी तीन वर्षांची मुदत राहील. या मुदतीच्या आधीच जर तुम्ही कर्ज परत करत असाल तर तुम्हाला कोणतेच अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
जिओ फायनान्स आता कर्ज वितरणात उतरली आहे. शेअर्स किंवा म्युच्युअल फंड जर तुमच्याकडे असेल तर कर्ज गहाण ठेऊन अगदी सहज कर्ज घेऊ शकता. याबाबत कंपनीने एक अधिकृत निवेदन जारी केली. ग्राहक त्यांच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांना तारण ठेऊन कर्ज मिळवू शकतात. डीमॅट खाते एक प्रकारे बँक खातेच आहे. यामध्ये शेअर्स आणि म्युच्युअल फंडचा हिशोब असतो.
कर्जाची प्रक्रिया कंपनीचे म्हणणे आहे की खूप सोपी आणि सुरक्षित आहे. प्रक्रिया संपूर्ण डिजीटल आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जिओ फायनान्सवर तुम्ही अगदी घरबसल्या कर्जासाठी अप्लाय करू शकता. अर्जदाराला फक्त 10 मिनिटांतच कर्ज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. कर्जाचे व्याजदर 9.99 टक्क्यांपासून सुरू होईल. जर जास्त जोखीम असणारे ग्राहकांना मात्र जास्त व्याज द्यावे लागेल. जर तुम्ही कमी जोखमीचे ग्राहक असाल तर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.
या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही एक कोटींपर्यंत कर्ज मिळवू शकता. कर्ज परत करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांची मुदत देण्यात येते. जर तुम्ही मुदतीच्या आधीच कर्ज परत करत असाल तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. यामुळे तुमचे पैसे वाचतील. ज्या लोकांना पैशांची अचानक गरज भासते अशा लोकांसाठी ही सुविधा फायदेशीर ठरू शकते.