आजच्या महागाईच्या दिवसांत मुलांच्या शाळेच्या खर्च असो की दवाखान्याचा खर्च.. प्रत्येकात मोठी वाढ झाली आहे. हा खर्च कसा करायचा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर नेहमीच असतो. दवाखान्यातील उपचार आणि औषधांचा खर्च तर प्रचंड वाढला आहे. पण थांबा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स या खर्चातून वाचण्याचा मार्ग शोधत आहात का तर यासाठी (Health Insurance) चांगला पर्याय ठरू शकतो.
हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला खर्चाची काळजी रहात नाही. अचानक झालेल्या मेडिकल खर्चाचा भारही तुम्हाला सहन करावा लागत नाही. हेल्थ इन्शुरन्सबरोबर तुम्ही तुमच्या पगारातील काही रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून (Emergency Fund) ठेऊ शकता. जर तुम्हीही तुमच्या आई वडिलांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल परंतु वाढत्या प्रिमियमने (Insurance Premium) काळजीत पडला असाल तर हा प्रीमियम कमी करण्यासाठी काही टिप्स अवलंबू शकता.
60 वर्षे वयापर्यंत इन्शुरन्स घ्या
तुम्ही जितक्या कमी वयात इन्शुरन्स घेता तितकाच जास्त फायदा मिळतो. जर तुम्ही 30 वर्षे वयात आरोग्य विमा खरेदी केलात तर 60 वर्षे वयाच्या हिशोबाने कमी प्रीमियम येईल. म्हणूनच जितक्या लवकर हेल्थ इन्शुरन्स घेता येईल तितक्या लवकर घ्या. याच बरोबर तुम्ही दरवर्षी 5 ते 10 टक्के क्लेम बोनसचा फायदाही घेऊ शकता. तीन वर्षांची विमा योजना घेतली असेल तर 15 टक्क्यांची सूट मिळू शकते.
असा होईल प्रीमियम कमी
डिडक्टिबल आणि को पे च्या माध्यमातून तुम्ही प्रीमियम कमी करू शकता. डिडक्टिबल अमाउंट म्हणजे ही रक्कम तुम्हाला क्लेम करण्याआधी द्यायची असते. जसे की तुमचा एकूण खर्च कर 6 लाख रुपये झाला असेल तर यातील 2 लाख रुपये तुम्हाला डिडक्टिबल अमाउंटमध्ये द्यावे लागतील. राहिलेले चार लाख रुपये तुम्ही इन्शुरन्स कव्हरच्या माध्यमातून क्लेम करू शकता.
को पे अमाऊंट म्हणजे जितके टक्के रक्कम तुम्ही स्वतः देता. समजा तुमचा एकूण खर्च 10 लाख रुपये झाला असेल आणि को पे अमाऊंट 20 टक्के असेल तर 2 लाख रुपये तुमच्या खिशातून जातील. राहिलेली रक्कम कंपनीकडून दिली जाते. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही अमाऊंट वाढवून प्रीमियम कमी करू शकता.
विविध इन्शुरन्सची तुलना करा
विविध कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सची तुलना नक्की करून पाहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही बऱ्याच अंशी हेल्थ प्रीमियम अमाऊंट कमी करू शकता. तुलना करताना तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सवर मिळणाऱ्या विविध फायद्यांचीही माहिती मिळेल.