एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चढलेला असतानाही, महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत (Rainfall Alert)पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज आणि उद्या पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेती आणि जनजीवनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. कालही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. काही भागांत गारपीट झाल्याची नोंद असून याचा फटका केळी व इतर उन्हाळी पिकांना बसण्याची भीती आहे
कुठे राहणार ढगाळ वातावरण, कुठे बरसणार सरी?
मुंबई-राजधानी मुंबईत १५ एप्रिल रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र पावसाची शक्यता नाही. तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
मध्य महाराष्ट्र- मध्य महाराष्ट्रात तापमान २४ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. उत्तर भागात (नाशिक, जळगाव, धुळे):* उष्ण आणि दमट हवामान दक्षिण भागात (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर): तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा- मराठवाड्यात तापमान २८ ते ४० अंश सेल्सिअस. असून नांदेड, लातूर, धाराशिव या भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्यापावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इशारा देण्यात असून वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
You Might Also Like
विदर्भ – विदर्भात तापमान ३० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान. उष्णतेची लाट कायम असून नागपूर, अमरावती, यवतमाळ: हलक्यापावसाची शक्यता असून विजा आणि वारे त्रासदायक ठरू शकतात.
गेल्या २४ तासांतील हवामानाचा आढावा
मध्य महाराष्ट्रात काही भागांत गारपीट
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी
कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे
विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद
राज्यातील प्रमुख शहरांतील कालचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस):
मुंबई: कुलाबा – ३३.६, सांताक्रूझ – ३३.२
पुणे: ३८.५, लोहगाव – ४०.८
नाशिक: ३८.१, मालेगाव – ४१.८
सोलापूर: ४१.०, धाराशिव – ३९.६, संभाजीनगर – ३९.९
नांदेड, बीड, अकोला: ४२.४
चंद्रपूर: ४२.२, यवतमाळ – ४१.५, नागपूर – ४१.०
सर्वाधिक तापमान
राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूरसारख्या विदर्भातील भागांमध्येही ४१ अंशांच्या पुढे पारा गेल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
वादळी वाऱ्यांमुळे केळी, भाजीपाला, फळबाग यांना नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाची उपाययोजना करावी. विजांच्या कडकडाटामुळे विद्युत उपकरणे आणि जनावरांची देखील काळजी घ्यावी, असे हवामान खात्याचे आवाहन आहे.
राज्यात एका बाजूला उष्णतेचा कडाका, दुसरीकडे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – अशा विरोधाभासी हवामानाने नागरिकांनाही गोंधळात टाकले आहे. पुढील काही दिवस हवामानात बदलांची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.