Government employees : पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयाबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई

माय मराठी
2 Min Read

सध्या सरकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयाबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार लटकत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत की, जर कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयाबाहेर पडले तर त्यांना थेट निलंबित केले जाईल. मुख्यालयातून गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी मोठा इशारा दिला आहे. सार्वजनिक सेवेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना (Government employees) सोडले जाणार नाही. त्यांच्यावर निलंबन आणि इतर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सार्वजनिक सेवेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालयाबाहेर पडल्यास महसूल अधिकाऱ्यांवर निलंबन आणि इतर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील काही अधिकारी, तहसीलदारांपासून ते अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडक श्रेणीतील, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक यांच्यापर्यंत काही अधिकारी परवानगीशिवाय मुख्यालयातून वारंवार गैरहजर राहत असल्याचे आढळून आले. या संदर्भात मंत्री बावनकुळे यांना आलेल्या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर तथ्य आढळून आले आणि त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले.

सामान्य माणसाला सरकारी कामासाठी चार दिवस वाट पाहण्याचा अनुभव आहे. सामान्य माणसाला साध्या कामासाठीही वाट पहावी लागत असल्याने त्यांनी तक्रार वाचली होती. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला अडचणींना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा जनता कामाची वाट पाहत असते, अशा परिस्थितीत काही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. वरिष्ठांच्या अखत्यारीतील कोणताही अधिकारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही. आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. शिस्त, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख प्रशासन राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more