पेण (अरविंद गुरव)
गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या काल रविवारी झालेल्या कार्यकारणी सभेमध्ये संस्थेचे विध्यमान अध्यक्ष बंडू खंडागळे (Bandu Khandagale) यांची बिनविरोध फेर निवड झाली.
ही सभा सावरसई येथील गोवा व्हीला अँड रिसॉर्ट- पि.के बँकेट हॉल येथे पार पडली. या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज, संत काशिबा महाराज, देव देवतांचे पूजन केले. यावेळी निधन पावलेल्या गुरव समाज बांधव, त्याचबरोबर भारत पाकिस्तान युद्ध सुरू असल्याने देशाच्या सीमेवर ज्यांना वीरमरण आले आलेल्या सैनिकांसाठी दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली दिली.
यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांनी प्रोसिडिंग त्याचबरोबर आजपर्यंतचा जमाखर्च वाचन करून सर्व कार्यकारी मंडळांनी त्याला हात वरती करून एक मुखाने मान्यता दिली. या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने कामकाज सुरू असताना आज पर्यंत नियोजित समाज मंदिर जागा खरेदीसाठी ज्या सदस्य यांनी अद्याप पर्यंत संस्थेकडे आपली देणगी ठरावाप्रमाणे जमा केली नाही. याची माहिती संस्थेच्या वतीने अध्यक्ष यांनी सभागृहात मांडली.
या सर्वसाधारण बैठकीसाठी पेण येथील अनेक समाज बांधव स्थानिक यावेळी उपस्थित होते. या सर्वसाधारण बैठकीत समाजातील समाज बांधवांचे काही कौटुंबिक, वैवाहिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न, संस्थेचे अध्यक्ष- बंडू खंडागळे (Bandu Khandagale)यांनी संस्थेच्या अधिकृत पटलावर घेऊन त्याबाबतीमध्ये कार्यकारी मंडळासमोर दोन्ही समाज बांधवांना सामोरे घेऊन व्यक्तिगत मध्यस्थीची भूमिका भूमिका मांडून मार्गदर्शन केले.
यावेळी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या संभाजीनगर येथील सर्वसाधारण बैठकीतील संपूर्ण महाराष्ट्रातील गुरव समाज बांधवांसाठी नवे अँप तयार केले असून या अँपच्या माध्यमातून गुरव समाज बांधवांची जनगणना करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर श्री संत काशिबा महाराज आर्थिक विकास युवा महामंडळ आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला देवस्थान अधिनियम विश्वस्त कायदा १९५० या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विधेयक दुरुस्ती करण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी यावेळी उपस्थित सभागृहामध्ये सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष-बंडू खंडागळे, विजय साळुंके, सुरेश गुरव, रमेश (काका) राजगुरव, रमेश गुरव, सौ रुणाली गुरव, श्रीमती मंदा गुरव, संजय मोरे, रुपेश गुरव, रमेश (बुवा) गुरव, संदीप खंडागळे, रवींद्र गुरव, सचिन गुरव, प्रभाकर भालेराव, सुरेश दळवी, राजेंद्र निळकंठ, रामचंद्र गुरव, विनायक ढवळे, योगेश गुरव, प्रदीप बागुल, संजय गुरव, रमेश खंडागळे, विशाल गुरव, समीर गुरव, देविदास गुरव, नंदकुमार गुरव, हरेश खंडागळे, अमोल गुरव, विजय ठोसर, सौ अमृता ढवळे, भगवान गणेशकर, त्याचबरोबर स्थानिक समाज बांधव- यशवंत गुरव, अरुण गुरव, राजेंद्र गुरव, सौ लता गुरव, श्रीमती वासंती देवकर, अण्णा बिराजदार, वसंत गुरव, अभिजीत गुरव, प्रवीण गुरव, प्रशांत ढवळे, अजित अहिर, अमोल ढवळे, मनोहर अहिर, याप्रमाणे अनेक समाज बांधव उपस्थित होते.