डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या शौर्याला सलाम म्हणून, डोंबिवली (Dombivli) भाजपा पश्चिम मंडल सचिव व कै. शाहू सावंत प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सखारामनगर येथील जनसंपर्क कार्यालय परिसरात तिरंगा रॅली काढली. यावेळी परिसरातील नागरिकांना पेढे वाटून, भारतीय जवानांच्या शौर्याचा जयघोष केला आणि “भारत माता की जय” तसेच “वन्दे मातरम्” च्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले.
भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भा.ज.पा. पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या नेतृत्वात, कै. शाहू सावंत प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ नागरिक, युवा, महिला कार्यकर्त्यांसह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या जल्लोषपूर्ण कार्यक्रमात कैलास बाबाजी पवार (समाजसेवक), गणेश निंबाळकर, केशव अष्टपुत्रे, सखाराम आमणे, रमेश कुलकर्णी, संतोष म्हात्रे, अरुण सावंत, राहुल पाटील, विनायक निवाते, सुधाकर गूळवणी तसेच शोभा दिलीप कुमार सावंत, लीना पॉल जोसफ, मरियम शेख, मनीषा थोरात, पुष्पा खरोसे, अनिता सननाईक, शोभा थोरात यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली आणि नागरिकांना पेढे वितरित केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील १०० दहशतवाद्यांना ठार करून पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले. याबद्दल अभिमान व्यक्त करत, डॉ. सर्वेश शाहू सावंत यांनी सांगितले की, “भारतीय जवानांच्या शौर्यामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे.”
हे सर्व कार्य भाजपाचे पश्चिम मंडल अध्यक्ष पवन गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत केले गेले.