डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव):
फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून डोंबिवली (Dombivli) येथील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.०३% लागला आहे. शाळेने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही जपत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शाळेचे एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे उत्तम गुण मिळवून शाळेची शान वाढवली:
प्रथम क्रमांक: तनुश्री प्रल्हाद भोसले – ९०.८०%
द्वितीय क्रमांक: साक्षी दत्तात्रय डासाळ – ८९.८०%
तृतीय क्रमांक: देविका वैभव खैर – ८७.८०%
मुख्याध्यापिका संगीता प्रकाश पाखले यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाला आणि पालकांच्या सहकार्याला दिले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मागील १२ वर्षांच्या अभ्यासाचा आणि वर्षभर शाळेने आखलेल्या शैक्षणिक नियोजनाचा हा परिपाक आहे.”
You Might Also Like
शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया रचला, ज्यावर विद्यार्थ्यांनी यशाची इमारत उभारली. संस्थेचे अध्यक्ष आशुतोष रामदास येवले व सर्व संचालक मंडळाने देखील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतत प्रोत्साहन दिले.
मुख्याध्यापिका पाखले पुढे म्हणाल्या, “असे ध्येयवेडे शिक्षक, पालक आणि मार्गदर्शक जोपर्यंत आपल्या संस्थेत आहेत, तोपर्यंत के. रा. कोतकर शाळेचे विद्यार्थी यशस्वी होऊन देशाचे आदर्श नागरिक होतील व शाळेचे नाव उंचावतील.“