अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्य बँक (G S mahanagar bank) कर्मचारी युनियनचे अध्यक्ष ना. आनंदराव अडसूळ साहेब यांनी सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे उमेदवारांची सदिच्छा भेट घेत त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या. अडसूळ साहेब व सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे मैत्रीपूर्ण आणि स्नेहपूर्ण संबंध होते.
नुकत्याच जाहीर झालेल्या जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अडसूळ साहेबांनी स्वर्गीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी पॅनलच्या नेतृत्वकर्त्या गीतांजलीताई उदयराज शेळके यांना त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अडसूळ साहेबांनी जीएस महानगर बँकेच्या सर्व सभासदांना आवाहन केले की, संस्थापक पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, जेणेकरून बँकेचा विकास आणि पारदर्शक कारभार पहिल्यापेक्षा अधिक जोमाने आणि प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल.
प्रचाराचा नारळ फोडला
जी.एस. महानगर सहकारी बँक लिमिटेड, (G S mahanagar bank) मुंबईच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि चुरस पाहायला मिळत आहे. जी.एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी गीतांजलीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने आज मुंबईतील काॅटनग्रीन येथील राम मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. तसेच लालबागचा राजाच्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतले. लालबाग परिसरातील सर्व व्यापारी वर्गाशी यावेळी भेटीगाठी झाल्या. तसेच लालबागचा राजा मंडळाचे मा. सचिव सुधीर भाऊ साळवी हे देखील आपला पाठिंबा दर्शवत उपस्थित होते.