Dombivli (शंकर जाधव)
लेवा युथ फोरम डोंबिवली शहर व केंद्रीय संस्थेच्या वतीने आणि लेवा पाटीदार समाज मंडळ डोंबिवली यांच्या सहकार्याने रविवार, 1 जून रोजी लेवा पाटील भवन येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लेवा युथ फोरम डोंबिवली अध्यक्ष अतुल महाजन, सचिव सोहम कोल्हे, समाज मंडळ अध्यक्ष दिगंबर पाटील, सचिव सुभाष राणे, खजिनदार सतीश लोखंडे तसेच केंद्रीय अध्यक्ष हर्षद भंगाळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात खालील तपासण्या व मार्गदर्शन मोफत करण्यात आले –
नाक-कान-घसा, हाड व सांधे, नेत्र, दंत, रक्तदाब, मधुमेह, फिजिओथेरपी, कायरोथेरपी, बालरोग, पचन विकार, स्त्रीरोग, न्यूरोलॉजिस्ट, हृदयरोग, सामान्य शस्त्रक्रिया, एन्जिओप्लास्टी, बायपास, अपेंडिक्स, मुतखडा, कॅन्सर, मेरिकोझ, गुडघा बदल, ऑर्थोपेडिक, मुळव्याध, मणक्याचे विकार, युरो सर्जरी, त्वचारोग व केस संबंधित समस्या.
डोळा किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचाराची सोय करण्यात आली होती. याशिवाय विश्रांतीसाठी फूट मसाजची सुविधाही होती.
डॉ. तेजस सावदेकर यांनी सांगितले की, प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी अत्यावश्यक आहे.
दंतचिकित्सक डॉ. सुमित फिरके यांनी दातांबद्दल असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकत दातांची योग्य निगा राखण्याचे महत्त्व सांगितले.
डॉ. विशाखा जंगले यांनी पावसाळ्यातील स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले -बाहेरून घरात आल्यावर हात-पाय धुतल्यास संसर्ग टाळता येतो.
You Might Also Like
हा आरोग्य उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.