GS Mahanagar Co-operative Bank : जी.एस. महानगर बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांची भेट

माय मराठी
2 Min Read

जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (GS Mahanagar Co-operative Bank) २०२५ च्या संचालक मंडळ निवडणुकीत गीतांजली उदयराव शेळके (Geetanjali Udayrao Shelke) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने ८० टक्के मते मिळवून विरोधी पॅनेलच्या सुमनताई शेळके (Sumantai Shelke) यांच्या गटाचा पूर्णपणे धुव्वा उडवला. विशेष म्हणजे ही निवडणूक सासू विरोधात सून अशी होती. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने बाजी मारली.

आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी जी.एस. महानगर बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांसमवेत सदिच्छा भेट पार पडली. या भेटी प्रसंगी अजितदादांनी सर्व संचालक मंडळाला मोलाचे मार्गदर्शन केले. बँकेच्या आगामी वाटचालीसाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि सहकार क्षेत्रात बँकेने अधिक प्रगती साधावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या प्रेरणादायी भेटीमुळे संचालक मंडळाला नवचैतन्य आणि उत्साह मिळाला असून, आम्ही आता अधिक जोमाने काम करत, आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि आदरणीय उदयदादा यांच्या विचारधारेवर आधारित नेतृत्वात बँकेची घोडदौड निश्चितच पुढे नेऊ, अशी ग्वाही यावेळी संचालक मंडळाच्यावतीने दिली.

गीतांजली उदयराव शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली होती. गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने सर्व मतदारसंघांमध्ये ८० टक्के मते मिळवली, तर सुमनताई शेळके यांच्या पॅनेलला केवळ २० टक्के मते मिळाली. ही एकतर्फी विजयाने गीतांजली शेळके यांच्यावरील भागधारकांचा विश्वास अधोरेखित झाला.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more