Dombivli: आईसाठी आणि मातृभूमीच्या नावाने एक झाड-भाजपाचा पर्यावरण रक्षणासाठी आगळा संकल्प

माय मराठी
2 Min Read

 शंकर जाधव (Dombivli)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने डोंबिवली  (Dombivli) पूर्वमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा उपक्रम “आपल्या आईसाठी आणि मातृभूमीच्या नावाने एक झाड” या घोषवाक्याने साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचे मार्गदर्शन भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांनी केले, तर आयोजनात भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब व डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर यांचे नेतृत्व होते.

कार्यक्रमात अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर, माजी नगरसेविका खुशबू चौधरी, तसेच प्रकाश (बाळा) पवार, संजीव बिडवाडकर, दिनेश दुबे, रविंद्र चौधरी, आर.पी. मिश्रा, संदीप गोसर, सूर्यकांत कदम, आनंदा अगरवाल, वंदना गोडबोले, माधवी दामले, वर्षा परमार, श्रुती उरणकर यांचा समावेश होता. त्याचबरोबर राजू शेख, अमित टेमकर, अंकुश कुलकर्णी, भरत राठोड, सुनिता दांडेकर, हसमुख जोशी, सुनिल मिश्रा, अथर्व कांबळे, यश खांडगे, सिद्धार्थ शिरोडकर, अभिषेक रायन, धनंजय गोईल, सोहम माने, रुद्र सपकाळ, वर्षा कोठारी, यश वादवाना, अमित मिश्रा, राजाजी सिंघानी, तुषार नेरूरकर, प्रियांशु उपाध्याय, लाजपत जाधव यांसारखे अनेक कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले होते.

मितेश पेणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आपल्या पर्यावरणाची जबाबदारी आपणच घ्यायला हवी. निसर्गाशी मैत्री करून त्याचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आज केलेले हे वृक्षारोपण भावी पिढ्यांसाठी सुरक्षित भवितव्य घडवू शकते.”

कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. यावेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more