Dombivli : पश्चिमेला फेरीवाला मुक्त परिसर… मग पूर्वेला का नाही? शिवसेना (ठाकरे) पक्षाचा आमरण उपोषणाचा इशारा

माय मराठी
2 Min Read

शंकर जाधव (Dombivli)

डोंबिवली (Dombivli) पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर गेली अनेक वर्षे फेरीवाला मुक्त ठेवण्यात यश आले असतानाही, डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात मात्र आजही फेरीवाले मोकळेपणे बसत असल्याने स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे डोंबिवली पूर्व शहरप्रमुख अभिजित सावंत हे ११ जूनपासून इंदिरा चौकात आमरण उपोषणाला बसणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या आदेशानुसार, स्टेशनपासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरीही जागा उपलब्ध न केल्यामुळे नोंदणीकृत फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत आहेत.
‘फ’ आणि ‘ग’ प्रभागाचे सहायक आयुक्त फेरीवाल्यांवर कारवाई करत असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, महापालिकेचे धोरण मात्र स्पष्ट दिसत नाही – जोवर जागा नाही, तोवर फेरीवाले रस्त्यावरच बसणार, ही त्यांची भूमिका आहे.

डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील स्टेशन परिसरातून फेरीवाले हटवून त्यांना विष्णुनगर पोस्ट ऑफिसजवळ जागा उपलब्ध करून दिली गेली. भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश आणि मनीषा धात्रक यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे पश्चिमेकडील परिसर आजही फेरीवाला मुक्त आहे. त्यांच्या लक्षामुळेच हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ आणि मोकळा राहिला आहे.

मात्र डोंबिवली पूर्वेकडे तशीच ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र असून, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाअभावी अडचणी वाढत आहेत.
“हक्काची जागा मिळेपर्यंत आम्ही येथेच बसणार” ही फेरीवाल्यांची भूमिका कायम आहे. यावर शहरप्रमुख सावंत यांनी नागरिकांच्या तक्रारींचा आधार घेत फेरीवाला मुक्त पूर्व स्टेशन परिसर ही मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमरण उपोषणानंतर नऊ हजार नोंदणीकृत फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळेल का?जर मिळाली, तर डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरही फेरीवाला मुक्त होऊ शकेल का?

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more