Mohsin Mujawar: पेण पोलीस ठाण्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

माय मराठी
2 Min Read

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मोसिन मुजावर (Mohsin Mujawar)विरुद्ध पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल !

पेणमध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली

पेण दि. १० (अरविंद गुरव) –

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशावर भारतीय सैनिक जीवाची पर्वा न करता पाकिस्तान विरोधात दिवस रात्र लढा देत आहेत. मात्र भारतात राहणारे काही गद्दार भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच काहीसा प्रकार पेणमध्ये घडला आहे.

पेण मधील मुस्लिम समाजाचा मुलगा मोसिन मुजावर (Mohsin Mujawar) याने इन्स्टाग्राम ॲप वरील आयडीवरून दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी पोस्ट केल्या आहेत. त्यात “इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे” असे देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला.

पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत निषेध रॅली काढली. पेण पोलिसांनी याची दखल घेत मोसिन मुजावर याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३/१ ख व ३५३ (२) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more