Acidity : पित्ताचा त्रास होतोय? पित्ताची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय..

माय मराठी
5 Min Read

Acidity : पित्ताचा त्रास होतोय? पित्ताची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय..सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमधून स्वतःच्या आरोग्याकडे बरेचसे दुर्लक्ष होत असते, यामध्येच पित्ताची समस्या बऱ्याच लोकांकडून आपण ऐकतो.
नेमकी पित्ताची सुरुवात कशामुळे होते, त्याची लक्षणे आणि घरगुती उपाय आपण आज सविस्थार जाणून घेऊयात.

पित्त होण्यामागची कारणे

१. जास्त मसालेदार पादार्थांचे सेवन आहारात असणे – अनेकदा आपण ऑफिस, कॉलेजच्या धावपळीमध्ये बाहेरच्या जेवणाचा जास्त प्रमाणात समावेश करत असतो परुंतु जीभेला आवडणारे पदार्थ आपल्या आरोग्याला हानी पोहचवणारे असतात. कोणताही आहार हा कमी मसाल्याचा जेवढा असतो तेवढाच तो आपल्या आरोग्यास उपयुक्त असतो. शक्य तेवढे मसालेदार पदार्थ टाळणे.

२. भावनिक ताण – ताणतणाव हि एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अतिशय भयंकर आजाराची शिकार बनवू शकते. प्रत्येक गोष्टीचा आपण किती प्रमाणात ताण घ्यावा हे आपल्या हातात आहे, जर तुम्ही सतत एकाच गोष्टीमध्ये अडकून राहिलात, आणि ती गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी जर घातक असेल तर त्याचे एका आजारामध्ये रूपांतर होते. तुमच्या ताणतणावावर तोडगा काढणे हि पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे.
तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जेव्हा शरीर तणाव अनुभवते तेव्हा ते शारीरिक प्रतिक्रियांचा एक प्रवाह सुरू करते, ज्यामध्ये कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारखे ताण संप्रेरक सोडणे समाविष्ट असते. हे घटक पचनसंस्थेवर आणि त्याच्या कार्यांवर परिणाम करू शकतात.

३. कॉफी, ब्लॅक टी, धूम्रपान, अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ – कॉफी, ब्लॅक टी, धूम्रपान, अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थांच्या अति सेवनाने देखील पित्ताची सुरुवात होऊ शकते. आहारामध्ये कोणत्याही पदार्थाचे अति सेवन हे आरोग्यास घातक ठरू शकते याची काळजी घेणे गरजेचे आहे.

४. विरुद्ध आहार घेणे – बऱ्याच लोकांना विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय हेच माहित नसतं तर आधी विरुद्ध आहार काय आणि त्यामुळे होणारे आजार नेमके काय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, तूर डाळ आणि त्यामध्ये वापरला जाणारा टोमॅटो हे पित्ताचे कारण ठरू शकते तसेच सकाळी न्ह्यारीच्या वेळेस चहा आणि चपातीचे सेवन करणे महागात पडू शकते.

५. उन्हात सतत वास्तव्य – आपण पाहतो ज्या दिवशी आपण उन्हात जास्त वेळ असतो त्यादिवशी छातीत जळजळ होऊ लागते. ज्या व्यक्तींना उन्हाचा त्रास होऊ लागतो त्यांना शरीरातील पित्त हे वाढत असतं. यामुळे शक्य तेवढे उन्हात जाणे टाळणे.

पित्त झाल्यांनतरची लक्षणे –

१. सतत घश्याला कोरड पडणे – घश्याला कोरड पडणे तसेच खूप वेळाने काहीही खाल्यास मळमळणे.

२. महिलांना मासिक पाळीच्या समस्या उध्दभवणे – वेळेत पाळी न येणे, रक्तस्रावामध्ये फरक जाणवणे. रक्तस्रावास एक उग्र वास येणे.

३. वेळेत जेवण न केल्यास जळजळ/ मळमळ होणे – जेवणाची, न्याहारीची वेळ न पाळता इतर वेळी जेवल्यास उलटी होणे किंव्हा मळमळणे.

४. केस सतत गळणे/ पांढरे पडणे – ताणतणाव आणि पित्त या दोन्ही गोष्टीमुळे आपल्या केसांना पूरक घटक मिळत नाहीत.

५. शरीरातून दुर्गंध येणे – तुम्ही किती प्रमाणात पर्फुम अथवा सुगंधी गोष्टी वापरल्या असल्या तरीही शरीरातील दुर्गंध थांबत नाही.

६. एका विशिष्ट पद्धतीच्या फोड्या तोंडावर येणे – पित्तामुळे एका वेगळ्या रंगाच्या फोड्या चेहऱ्यावर येण्यास सुरुवात होते ज्यांनी चेहरा देखील काळा दिसू लागतो.

७. आळस वाटणे – कोणत्याही कामात उत्साह न वाटणे सतत अराम करावासा वाटणे. यांनी चिडचिड पणा देखील वाढू शकतो. कोणत्याही शुल्लक कारणावरून मतभेद होणे.

पित्तावरचे घरगुती उपाय –

१. अचूक आहाराचे सेवन करा – पित्त होणारे पदार्थ टाळा, आंबट फळांपेक्षा गोड फळे खा. दूध, तूप, लोणी हे पित्त शांत करण्यास मदत करतात. शक्य असेल तेवढे घरचे जेवण करा. पाण्याचे प्रमाण शरीरात जास्त असणे गरजेचे असते. खाण्यामध्ये जास्त वेळ नसायला हवा.

२. वेळेचे योग्य नियोजन करा – अतिशय कामात गुंतून राहणे आणि अति आळस करणे टाळा. काही वेळ स्वतःसाठी, स्वतःच्या ताणतणावातून बाहेर येण्यासाठी वापरा.

३. चांगल्या गोष्टींमध्ये आपला वेळ गुंतवा – नियमित आहार घ्या. चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.

४. नियमित ध्यान करा आणि काही गोष्टींसाठी कृतज्ञ रहा – आपल्या पित्त प्रकृतीमुळे गोंधळलेलं मन शांत करण्यासाठी ध्यान करा. तसेच, तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टींची यादी करा आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जे आहे त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघा.

५. पित्ताचे प्रमाण जास्त झाल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस योग्य त्या आयुर्वेदिक गोष्टींचा समावेश आहारामध्ये करावा. तसेच जवळील आरोग्य तज्ज्ञांकडून त्या बाबतीत अधिक माहिती घेणे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more