आपल्याला खूप साऱ्या मानसिक आजारांबाबत अजून देखील पुरेशी माहिती नाहीये. सोसिअल मीडियामुळे आपण सतत ANXIETY आणि DEPRESSION बद्दल सर्रास ऐकत असतो पण काही असे मानसिक आजार आहेत ज्या बद्दल आपल्यला अजून हि काही कल्पना नाहीये. पण ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे, म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत ADHD बद्दल काही माहिती.
ADHD म्हणजे Attention Deficit Hyperactivity Disorder, हा एक न्यूरोबायोलॉजिकल आजार आहे. हा आजार व्यक्तीच्या लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, impulsive आणि उर्जा नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित करतो. हा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये दिसतो, परंतु तो किशोरवयीन किंवा वृद्ध व्यक्तींमध्येही असू शकतो. ADHD असलेल्या व्यक्तींना शाळेत, कामावर आणि सामाजिक जीवनात विविध अडचणी येऊ शकतात.
लक्षणे :
कोणत्याही गीष्टींवरती लक्ष केंद्रित न होणे :
एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
कार्ये अधूरी ठेवणे किंवा सुरूवातीला दिलेल्या सूचना पूर्ण न करणे.
प्रत्येक गोष्टीत लक्ष विचलित होणे.
बहुतेक गोष्टी विसरणे
मनात खूप विचार येणे आणि साध्या कामात देखील कमी लक्ष केंद्रित करणे.
अत्यधिक हालचाल आणि वेळे पूर्वीच प्रतिसाद देणे :
You Might Also Like
एकाच ठिकाणी बसून राहणे अवघड वाटणे, सतत हालचाल करणे.
छोट्या गोष्टीवर हि राग येणे किंवा बाकीच्यांच्या संभाषणात अडथळा आणणे.
विचार न करता निर्णय घेणे.
नको तिथे उगीच चीड चीड करणे.
कारणे:
ADHD होण्याचे कारण निश्चितपणे समजलेले नाही, परंतु विविध घटक त्यात दिसून आलेले आहेत :
जीन (Genetics): ADHD चे लक्षणे अनेकदा कुटुंबांमध्ये दिसतात. त्यामुळे हे एक आनुवंशिक आजार असू शकतो.
मेंदूची रचना आणि कार्य (Brain Structure & Function): काही व्यक्तींमध्ये मेंदूच्या काही भागांचे कार्य कमी असू शकते, जे लक्ष नियंत्रित करतात.
प्रसूतिचे पर्यावरणीय घटक (Prenatal Factors): गर्भावस्थेत मद्यपान, तंबाखू किंवा ड्रग्सचा वापर, आणि अधिक ताण घेतलेल्या गोष्टी ADHD निर्माण करू शकतात.
पर्यावरणातील प्रभाव (Environmental Factors): लहान मुलांमध्ये पालन पोषण मध्ये तुटवडा, अशा स्थितीमुळे ADHD चा धोका वाढतो.
निदान:
चर्चा आणि मुलाखत : डॉक्टर मुलाचा इतिहास आणि वागणूक तपासतो.
वागणूक तपासणी : शालेय शिक्षक, पालक आणि इतरांशी चर्चा करून वागणूक मोजली जाते.
मानसिक चाचणी : डॉक्टर ADHD चे लक्षण असल्यास अन्य मानसिक विकारांसाठी चाचण्या करतात.
उपचार:
ADHD चा उपचार विविध पद्धतींनी केला जातो. या उपचारांमध्ये खालील गोष्टी आहेत:
औषधांची उपचार: ADHD साठी साधारणपणे स्टिम्युलंट (Stimulant) औषधे वापरली जातात. हे औषधे लक्ष केंद्रित करण्यात मदत करतात.
वागणूक थेरपी: वागणूक थेरपीद्वारे व्यक्तीला योग्य वागणुकीचे प्रशिक्षण दिले जाते. यात व्यक्तीला कार्य पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे, वेळेचे व्यवस्थापन शिकवणे, आणि सामाजिक कौशल्ये सुधारण्यासाठी मदत करणे समाविष्ट आहे.
शाळेतील सहाय्य पद्धत : शाळेतही ADHD असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहाय्य दिले जाते. यामध्ये त्यांना अतिरिक्त वेळ, शांत वातावरण, आणि व्यक्तिगत मार्गदर्शन दिले जाते.
जीवनशैलीतील बदल: नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, आणि पुरेशी झोप हे ADHD व्यवस्थापित करण्यात मदत करतात. शारीरिक क्रियाकलापांमुळे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारते.
ADHD चा प्रभाव:
ADHD असलेल्या व्यक्तींना अनेक सामाजिक आणि शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या शाळेतील कामात आणि सामाजिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. ते वारंवार वागणूक बदलतात, कधी एक गोष्ट तर कधी दुसरी गोष्ट करतात. यामुळे त्यांना कमी आत्मविश्वास किंवा अन्य मानसिक ताण येऊ शकतो.
ADHD आजाराकडे दुर्लक्ष न करता आणि अशा लोकांची टाळा टाळ न करता त्यांना समजून घेऊन जर योग्य व्यक्तींशी आणि योग्य आरोग्य तज्ज्ञांशी बोलून त्यावर उपाय केला तर ते जास्त फायदेशीर ठरू शकते. असे काही लोक जर तुमच्या आमच्यात असतील तर त्यांच्याशी प्रेमाची वागणूक ठेवणे गरजेचे असते, हे जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच त्यांच्यासाठी आपली वागणूक गुणकारी ठरू शकते.