Diva: आगासन ग्रामस्थांनी आरक्षण रद्द करण्या संदर्भात आमदार राजेश मोरेंना निवेदन

माय मराठी
1 Min Read

आगासन गावातील खाजगी जागेवरील अन्यायकारक आरक्षण तात्काळ हटवण्यात यावे, रस्ते गावाबाहेरून घ्यावे यासाठी आगासनगाव संघर्ष समितीच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभा (Diva) मतदार आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. सदर आरक्षण हे हटवण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर गावकऱ्यांची संयुक्त बैठक लावून हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. यावेळी आगासनगाव संघर्ष समितीतर्फे आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी आगासनगाव संघर्ष समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more