Akola : नकली सोने गहाण ठेवून फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा

माय मराठी
1 Min Read

Akola : अकोल्यात नकली सोने गहाण ठेवून कर्ज उचलण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला, आणि पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. १७ डिसेंबर २०२४ रोजी आशुतोष पारसकर (२५, अकोला) याने चार सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवून १ लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतर त्याने दोन अंगठ्या सोडवल्या, पण ५० हजार रुपयांचे कर्ज बाकी ठेवले. यानंतर यश उईके (२२, बुलढाणा) आणि चेतन अवताडे (२२, वाशीम) हे दोघे २२ ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन कर्जासाठी आले. कंपनीने तपासणी केली असता साखळी नकली असल्याचे समजले.

चौकशीत यश आणि चेतनने सांगितले की त्यांनी ही साखळी आशुतोष पारसकरकडून आणली होती. पारसकर याने हि कबूल केले की त्याने फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले सोने नकली होते. हे सोने रोहित गोकटे (२८, अकोला) याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले. गोकटे याने यापूर्वीही फायनान्स कंपनीला २.३७ लाख रुपयांची फसवणूक केली होती.

या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशुतोष पारसकर, यश उईके आणि चेतन अवताडे यांना अटक करण्यात आली असून, नकली सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more