बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी (Akshay Shinde) अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला होता. आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. अक्षय शिंदेचे पालक गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता आहेत आणि त्यांच्या वकिलांच्या संपर्कात नाहीत अशी माहिती मिळाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) एन्काउंटरची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तथापि, या आदेशानंतर, अक्षयचे पालक अचानक संपर्काबाहेर गेल्याचे वृत्त आहे आणि त्यांचे घर कुलूपबंद आढळले आहे. अंबरनाथमध्ये त्यांच्या मावशीकडे राहणारे अक्षय शिंदेचे पालक देखील तेथून निघून गेल्याचे उघड झाले आहे.
अक्षय शिंदे (Akshay Shinde) एन्काउंटर प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी शिंदेच्या पालकांनी वकील अमित कतरनवारे यांची नियुक्ती केली होती. तथापि, त्यांना खटला लढवायचा नसल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर, पालक आता त्या वकिलांच्या संपर्कातही नाहीत. गेल्या दीड महिन्यांपासून शिंदेचे पालक कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही, ते कुठे गेले किंवा कसे आहेत याची कोणालाही माहिती नाही.
त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, अक्षय शिंदे (Akshay Shinde) प्रकरणात आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात मोठा निर्णय घेत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दावा केला होता की हा माझ्या मुलाचा एन्काउंटर नसून एक नियोजित कट होता. या प्रकरणात, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असेही उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.