Alum Benefits: चेहरा आणि केसांसाठी तुरटी, फायदे आणि वापरण्याचे सोपे मार्ग

माय मराठी
1 Min Read

तुरटी (Alum) हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या घरात सर्रास आढळतो. हे हार्ड क्रिस्टलसारखे दिसते. प्राचीन काळापासून तुरटीचा वापर त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी केला जातो. तर जाणून घेऊया कशा पारकर तुरटी वापरता येईल.

१.मुरुमे दूर करण्यास मदत
तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुमे दूर करण्यास मदत करतात. मुरुमांची समस्या असल्यास तुरटी पाण्यात विरघळवून चेहऱ्यावर लावा. हे त्वचेचे छिद्र साफ करण्यास मदत करते आणि मुरुम कोरडे करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

२. त्वचा घट्ट आणि तरुण ठेवते
तुरटी वापरल्याने त्वचा घट्ट राहते. वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होऊ लागते, मात्र तुरटीच्या रोजच्या वापराने त्वचा घट्ट राहते.

३. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी उपयुक्त
ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या समस्येने हैराण आहात? तुरटी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे उघडतात आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर होण्यास मदत होते.

४. डोक्यातील कोंड्याची समस्या
तुरटी पाण्यात विरघळवून केसांच्या मुळांना लावा आणि काही वेळाने धुवा. यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल आणि केसांना चमकही येईल.

५. केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त
केस गळण्याची समस्या असल्यास तुरटीचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more