Dombivli : सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली ( शंकर जाधव )

सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला मराठी कुटुंबीयांना विरोध करत मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. ही डोंबिवलीजवळील (Dombivli) नांदिवली मधील एका सोसायटीत घडली. या वादातून सोसायटीमध्ये गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला.रविवारी रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले असल्याचा मराठी कुटुंबियांनी आरोप केला आहे.याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवुन घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more