Ratnagiri : रत्नागिरीत अंमली पदार्थविरोधी कारवाई; ब्राउन हेरोईनसह तीन जण अटकेत

माय मराठी
1 Min Read

Ratnagiri : रत्नागिरी शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली असून, तीन जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमतीचे ‘ब्राउन हेरोईन’ जप्त करण्यात आले आहे.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पोलिसांनी गस्त वाढवत, अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी गस्त सुरू केली.

गस्तीदरम्यान, एकता नगर परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये रऊफ इक्बाल डोंगरकर (३५) नझीर अहमद मोहम्मद वस्ता (३८) आणि राहील अजीज सुवर्णदुर्गकर (२९) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४०५ ब्राउन हेरोईनच्या पुड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या तिघांविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८ (क), २१ (ब), २९ अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रत्नागिरीतील अंमली पदार्थ व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more