एआर रहमान (AR RAHMAN) यांनी मुंबईतील ‘छावा’ चित्रपटाच्या म्युझिक एल्बम लाँच कार्यक्रमात रणवीर इलाहाबादिया आणि समीर रैना यांच्या व्हायरल व्हिडिओवर निशाणा साधला. ते कोणाचं नाव घेऊन उल्लेख करत नव्हते, पण त्यांची टिपणी इतकी मजेदार होती की विक्की कौशल सोबत सर्व उपस्थित लोक हसू लागले.
संगीतकार एआर रहमान नेहमी वाद-विवादांपासून दूर असलेले आपण पाहतो. पण या कार्यक्रमात विक्की कौशलने त्यांना एक प्रश्न विचारला – “तुम्ही तुमच्या म्युझिकला इमोजीच्या माध्यमातून कसं व्यक्त कराल?” त्यावर एआर रहमान त्यांचं असं उत्तर होतं, “माझ्या म्युझिकला व्यक्त करण्यासाठी मी फक्त त्या इमोजीचा वापर करेन ज्यात तोंड बंद असलेला एक चेहरा असतो ,” आणि पुढे म्हणाले, “माझ्या मते, मागच्या २ दिवसांत आपण पाहतच आहोत, जेव्हा तोंड उघडतं तेव्हा काय होऊ शकतं.”
यानंतर त्यांनी छावा चित्रपटातील काही गाणी मंचावर लाइव्ह सादर केली आणि पियानो वाजवले. विक्की कौशलने एआर रहमानच्या म्युझिकची प्रशंसा केली आणि सांगितले की, त्याचं हे स्वप्न होतं की त्यांच्या चित्रपटाचं संगीत एआर रहमान बनवतील, आणि ‘छावा’च्या माध्यमातून हे स्वप्न सत्यात येत आहे.