मार्च महिन्यात होळी, धुलीवंदन, गुढीपाडवा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा विविध सण उत्सवांच्या निमित्ताने लोक सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays) फिरायला जाण्याचा विचार करतात, तर काही जण आर्थिक नियोजनात व्यस्त असतात. जर तुमच्याकडेही मार्च महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण मार्चमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार-रविवारी वगळता भारतातील सार्वजनिक आणि खाजगी बँका सात दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, ७, १३, १४, १५, २२, २७, आणि २८ मार्च रोजी बँका बंद राहतील. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्यामुळे त्या दिवशीही बँकांना सुट्टी असते, पण संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारी आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी त्या दिवशी सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
मार्चमध्ये बँका बंद राहणार्या सुट्ट्या:
७ मार्च: चापचर कुट सणाच्या निमित्ताने मिझोरममधील सर्व बँका बंद राहतील.
१३ मार्च: छोटी होळी, होलिका दहन आणि अट्टुकल पोंगलनिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आणि केरळमधील सर्व बँका बंद
१४ मार्च: होळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील बँका बंद
१५ मार्च: होळी आणि याओशांग सणाच्या निमित्ताने त्रिपुरा, ओडिशा, मणिपूर, आणि बिहारमधील सर्व बँका सुट्टीवर असतील.
२२ मार्च: बिहार दिनानिमित्त बिहारमधील सर्व बँका बंद
२७ मार्च: शब-ए-कद्रनिमित्त जम्मू-काश्मीरमधील सर्व बँका बंद
२८ मार्च: जुमात-उल-विदा आणि उगादीनिमित्त जम्मू-काश्मीर, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणामधील सर्व बँका बंद
सुट्टीत आपल्या महत्त्वाच्या बँकिंग कामांची प्राधान्याने योजना करा, त्यामुळे आपल्याला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही!