Bank Strike: सलग 4 दिवस बँका राहणार बंद, देशव्यापी संपामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम

माय मराठी
2 Min Read

बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचारी 24 आणि 25 मार्च रोजी संपावर जाणार आहेत (Bank Strike), त्यामुळे 22 मार्चपासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने विविध मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे.

का होत आहे संप? बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

  • सरकारी बँकांमधील रिक्त जागांवर तातडीने भरती करावी.
  • कार्यप्रदर्शन पुनरावलोकन आणि प्रोत्साहन योजना मागे घ्यावी नवीन धोरणांमुळे नोकरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असा आरोप.
  • सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेला बाधा पोहोचतेय.
  • सध्याची मर्यादा ₹25 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी, तसेच आयकर सवलत मिळावी.
  • आयबीए शी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.

बँका कधी राहणार बंद?

  • 22 मार्च – चौथा शनिवार (सुट्टी)
  • 23 मार्च – रविवार (सुट्टी)
  • 24 मार्च – कर्मचारी संप
  • 25 मार्च – कर्मचारी संप

यामुळे सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प राहणार आहेत.

संपाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

  • डिजिटल फंड ट्रान्सफर आणि पेमेंट्स प्रभावित एनईएफटी व्यवहार ठप्प होतील.
  • चेक क्लिअरन्स आणि एटीएम सेवा विस्कळीत रोख रक्कम काढण्यास अडचण.
  • छोटे व्यापारी, उद्योग आणि कॉर्पोरेट हाऊसेस यांना आर्थिक फटका.
  • चार दिवस बँका बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता.

सामान्य नागरिकांसाठी सूचना:

  • अत्यावश्यक बँकिंग कामे 22 मार्चपूर्वी पूर्ण करा.
  • डिजिटल व्यवहारांसाठी पर्यायी मार्गांचा विचार करा.
  • रोख रक्कम व्यवस्थापन करून ठेवा.

बँकिंग व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सरकार आणि बँक युनियन्समध्ये तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more