उन्हामध्ये चेहरा रखरखीत वाटतोय? आणि डेड स्किन जाणवतेय? तर हे घरगुती उपाय (Beauty Tips) करून पहा
उन्हाळ्यात तासभर बाहेर राहिल्यानंतर किंवा अधिक उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि डेड होऊ शकते. त्यासाठी काही घरगुती लेप आणि उपाय वापरून त्वचेला आराम देणे, हायड्रेट करणे आणि ताजेपण मिळवणे गरजेचे आहे. या उपायांनी त्वचेला निसर्गिक पोषण मिळते आणि चेहरा एकदम चकचकीत दिसू लागतो. खाली दिलेल्या काही घरगुती उपायांनी तुम्ही त्वचा सौम्य आणि हायड्रेटेड ठेवू शकता.
दही आणि हळद : एका वाटीमध्ये २ चमचे हळद, आणि ३ ते ५ चमचे दही मिसळून तो लेप चेहऱ्यावर १५ ते २० मिनिट पर्यंत ठेवावा. यामुळे चेहऱ्याला एक उजाळा येईल आणि दही मुळे चेहरा थंड पडण्यास मदत होईल.
ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई तेल : १ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई तेल याचं मिश्रण तयार करून घ्या आणि त्याचा लेप तुमच्या चेहऱ्याला साधारणपणे १० ते १५ मिनिट पर्यंत लावून ठेवा या मिश्रणाचा वापर त्वचेला सॉफ्ट आणि हायड्रेटेड ठेवतो. हे ऑईल त्वचेतील पाणी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेला ताजेपण देण्यासाठी मदत करते.
बेसन आणि दूध : बेसन पिठामध्ये आवश्यक एवढं दूध टाकून ते मिश्रण तयार करून घ्या. आणि १५ ते २० मिनिट पर्यंत ते चेहऱ्याला लावून ठेवा. यानी चेहऱ्यावर एक नवा ग्लो येतो आणि चेहरा स्वच्छ होऊन जातो.
गुलाब जल आणि ताज्या काकडीचा रस : ताज्या काकडीच्या रसामध्ये ५ ते ६ ड्रॉप गुलाब जल टाकून ते मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा. यांनी चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल तसेच त्वचेमध्ये एक सौम्यपणा जाणवेल.
संत्रीची साल, दूध आणि हळद : संत्रीची साल उन्हात वाळवून त्याची पावडर टायर करून घ्यायची. त्यामध्ये १ चमचा हळद आणि जेवढं पात्तळ हवे असेल तेवढं दूध घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावावे. संत्रीच्या सालीमुळे व्हिट्यामिन सी त्वचेला मिळाले जाते. आणि हळद, दूध तर आपल्या चेहऱ्यासाठी उपयुक्तच असते.
आंबी हळद आणि मध : रात्री झोपण्यापूर्वी आंबी हळद आणि मध याचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा मऊ पडतो आणि डार्क सर्कल्स किंवा डाग कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.
बिट आणि तूप : ताज्या बीटच्या रसामध्ये अगदी २ ते ३ छोटे चमच तूप टाकून ते चेहऱ्याला लावा यानी चेहऱ्याला ग्लो येईल आणि तुपानी चेहरा सौम्य होईल.
केळीची साल : केळीची साल चेहऱ्याला घासल्याने चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
हे सर्व बाहेरील उपाय झाले पण उन्हाच्या झळांचा त्रास रोखण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे पाणी जाणे देखील आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घेणे, पाणी असलेले फळं खाणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यात सब्जा आणि तुळशीची पाने टाकून पीत जा. यामुळे तुमच्या चेहऱ्यालाच नव्हे तर, केसांना देखील फायदे होऊ शकतात.