CIBIL SCORE हा कर्ज मिळवताना खूप महत्वाचा मुद्दा ठरतो. कारण, तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर कर्ज मिळवणे सोपे होऊन जाते. कमी CIBIL स्कोर असतानाही तुम्हाला कर्ज मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला जास्त व्याज भरावे लागू शकते. त्यामुळे CIBIL स्कोर चांगला असल्यावर तुमच्या कर्जावर कमी व्याज दर मिळू शकतो. तुमचा CIBIL स्कोर वाढवण्यासाठी काही मार्ग आहेत, जे तुम्ही वापरून तुमचा स्कोर सुधारू शकता.
तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्वाचे घटक :
तुमचे सर्व कर्ज वेळोवेळी फेडून टाका
तुमचे ईएमआय चे हप्ते वेळेवर भरा
तुमचा क्रेडिट वापर मर्यादित करा
विविध प्रकारचे क्रेडिट घ्या
क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा
तुमचे सर्व कर्ज वेळोवेळी फेडून टाका :
तुम्ही जर कर्ज घेतलेले कर्ज वेळेत परत करत नसाल, तर ते तुमच्या CIBIL रिपोर्टमध्ये दिसून येतं आणि तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून, तुमचा स्कोअर सुधारण्यासाठी राहिलेले कर्ज त्वरित फेडणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर फेडून किंवा एकाच वेळी सगळं कर्ज परत करून ते बंद करू शकता. क्रेडिट वापरताना जबाबदारी दाखवल्याने तुमचा स्कोअर सुधारू शकतो.
तुमचे ईएमआय चे हप्ते वेळेवर भरा :
फक्त EMI पेमेंट करणे पुरेसे नाही. जर तुम्ही वेळेवर पेमेंट केले नाही, तर तुमचा CIBIL स्कोअर कमी होऊ शकतो. थकीत EMI पेमेंट्स तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवला जातो, ज्यामुळे तुमचा स्कोअर खराब होतो. वेळेवर पेमेंट्स करण्यासाठी, तुम्ही तुमच्या बॅंक खात्यातून ऑटोमॅटिक पेमेंट सेट करू शकता. यामुळे, तुम्हाला बाउन्स शुल्कांचा सामना करावा लागणार नाही आणि तुमचा CIBIL स्कोअर सुधरेल.
तुमचा क्रेडिट वापर मर्यादित करा :
अति कर्जाचा वापर केल्याने कर्ज देणाऱ्यांना असे दिसून येते की तुम्ही तुमच्या उत्पनाच्या हिशोबाने तुम्ही जगू शकत नाही. तुम्ही जेवढे परतफेड करू शकता तितकेच कर्ज वापरणे देखील महत्वाचे आहे. तुमचा क्रेडिड कार्ड चा वापर तुमच्या उत्पनापेक्षा जास्त होणार नाही दक्षता बाळगावी.
विविध प्रकारचे क्रेडिट घ्या :
तुम्ही फक्त एकाच प्रकारचे क्रेडिट घेतले आणि दुसरे क्रेडिट वापरले नाही, तर तुमचा CIBIL स्कोअर सुधारणार नाही. तुमच्या स्कोअरला सुधारण्यासाठी, सुरक्षित आणि असुरक्षित दोन्ही प्रकारचे क्रेडिट वापरणे महत्त्वाचे आहे. हे क्रेडिट तुम्ही काळजीपूर्वक परत करत राहिल्यास तुमचा स्कोअर वाढेल. विविध प्रकारच्या क्रेडिटचा अनुभव घेतल्याने तुमच्या स्कोअरला फायदा होईल.
क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा :
तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून त्यात कुठलेही त्रुटी किंवा चुकीच्या गोष्टी आहेत का ते पहा आणि लगेच दुरुस्त करा.जसे की तुमचे कर्ज, क्रेडिट कार्ड्स, आणि पेमेंट्स कसे आहेत. तसेच, तुम्ही क्रेडिट रिपोर्टमध्ये कुठेही चुकीच्या माहितीची नोंद आहे का ते तपासू शकता. जर काही चुकीचे असेल, तर तुम्ही ते दुरुस्त करण्यासाठी संबंधित संस्था किंवा बँकेला कळवू शकता.
तुम्ही हे सर्व टिप्स लक्षात ठेवून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. एक चांगला क्रेडिट स्कोअर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. म्हणजेच, कमी व्याज दरावर कर्ज मिळवणे आणि चांगल्या आर्थिक संधी मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल . त्यासाठी, जबाबदारीने क्रेडिट वापरणे आणि वेळेवर पेमेंट्स करणे आवश्यक आहे.