लवंग (Clove) फक्त घरगुती मसाल्यांमध्ये वापरणारा घटक नसून त्याचे खूप साऱ्या आजारांवर गुणकारी फायदे आहेत. ते तूम्हाला माहित आहेत आहेत का? नसेल माहित तर हरकत नाही आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. लवंग हा एक बहुउद्देशीय मसाला आहे, ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म समाविष्ट आहेत. बहुतेक वेळा आपल्याला केमिकॅल युक्त उपचारांपेक्षा घरगुती उपचार जास्त फायदेशीर असतात. त्यातलाच एक घटक म्हणजे गुणकारी लवंग….
लवंग खाण्याचे फायदे:
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – लवंग मध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले यूजेनॉल हा एक महत्वाचा घटक आहे, जो बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आपले संरक्षण करण्यास मदत करते. सर्दी झाल्यावर लवंगचा चहा घेणे उपयुक्त ठरू शकते.
पचनसंस्थेतील विकारांमध्ये आराम मिळवणे – लवंग पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर घटक आहे. यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे पचन क्रियेला मदत होते आणि पचनसंस्थेतील विविध समस्यांवर आराम देखील मिळतो. गॅस आणि अपचन वरती लवंग फायदेशीर मानलेली आहे. लवंग भूक वाढवण्यास उपयुक्त आहे. आणि लवंग मुळे अन्न लवकर पचण्यास हि मदत होते. पोटात जर सूज जाणवत असेल तर, ती देखील कमी करण्यासाठी लवंगचा वापर केला केला जातो. पित्त आणि सर्दी साठी लवंगचे फायदे अनेक आहेत.
श्वसनाच्या समस्यांवर, सर्दी आणि घसा खवखवण्यावर उत्तम उपाय – श्वसनाच्या समस्यांवर, सर्दी आणि घसा खवखवण्यावर लवंग हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. सर्दी मुळे आपण त्रस्त असतो अशा वेळी उकळलेल्या पाण्यात १..२ लवंग टाकून ते पिले तरी अराम जाणवतो.
दात दुखीमध्ये आराम – लवंगमध्ये असलेला यूजेनॉल हा एक नैसर्गिक दर्दनाशक घटक आहे, जो दातदुखी आणि तोंडाच्या इन्फ्लेमेशनवर प्रभावीपणे काम करतो. लवंग तेल दातावर किंवा दाताच्या आजूबाजूला लावल्याने वेदना कमी होतात, सूज कमी होते आणि तोंडातील वेदना हि कमी होतात. त्यामुळे दातदुखीमध्ये लवंग दाताखाली धरून ठेव असे आपण आपल्या थोरा मोठ्यांकडून ऐकत आलेलो आहोत.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे – लवंगमध्ये असलेले एंटीऑक्सिडंट्स आणि यूजेनॉल रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. लवंग शरीराच्या इन्सुलिनच्या कार्याला वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते. लवंग मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेच्या पातळीवर चांगला प्रभाव ठेवण्यास मदत करते.
तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत – लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे तोंडातील जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत होते. तोंडातील दुर्गंधी कमी होते. नियमितपणे लवंग चघळणे तुमच्यासाठी गुणकारी ठरते.
तसेच लवंग चा वापर अन्नाची चव आणि पोषण वाढवण्यासाठी केला जातो. टूथपेस्ट, दातदुखीवरील औषधे, आणि पोटातील विकारांवर उपचार करणारी औषधे तयार करण्यासाठी लवंग तेल वापरलं जातं. याच्या नियमित सेवनामुळे शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्यवर्धक फायदे मिळतात. त्यामुळे, लवंग आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करून आरोग्य राखण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.