भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रवास करण्याच्या नियमात बदल करणार आहे. आता जर तुमचे तिकीट कन्फर्म (Confirmed Ticket) नसेल जनरल डब्ब्यातून तर तुम्हाला प्रवास करावे लागण्याचा नियम लागू झाला आहे. आणि त्यात आता जर तुमचे तिकीट कन्फर्म नसेल तर रेल्वे स्टेशनवर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे हा निर्णय घेत आहे. देशातील 60 मोठ्या स्टेशनवर सुरुवातीला हा नियम लागू करण्यात येणार आहे.
देशातील 60 मोठ्या स्टेशनवर सुरुवातीला हा नियम लागू
मागील महिन्यात नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर यापूर्वी या पद्धतीच्या घटना घडल्या होत्या. मुंबईतील वांद्रे टर्मिनल येथेही या पद्धतीची घटना घडली होती. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने नवीन नियम आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार देशातील 60 मोठ्या स्टेशनवर कन्फर्म तिकीट धारकांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येणार आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल, वाराणसी, अयोध्या आणि पटणामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प लागू केला आहे. हा नियम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हावडा जंक्शन, चेन्नई सेंट्रल, बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशन येथेही लागू होणार आहे. या सर्व 60 स्टेशनची यादी अजून जाहीर झालेली नाही.
सध्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर कोणतेही तिकीट असले म्हणजे दोन तास आधी जाते येते. परंतु आता फक्त कन्फर्म तिकीट धारकांना ही सुविधा मिळणार आहे. ट्रेन येण्याच्या काही वेळेपूर्वी वेटिंग तिकीट किंवा जनरल तिकीट धारकास प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येणार आहे. या स्टेशनवर वेटींग एरीया असले. जनरल अन् वेटींग तिकीट धारकांना त्या ठिकाणी थांबता येणार आहे. 60 स्टेशनवरहा नियम सध्या लागू होणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती हळूहळू वाढवण्यात येणार आहे. नुकतीच यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हा नियम लागू करण्याचा निर्णय त्या बैठकीनंतर घेतला.
रेल्वेचा उद्देश
प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे स्थानकांवर चांगली व्यवस्था होईल आणि लोकांना प्रवास करणे सोपे होईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.
रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याची विनंती केली आहे आणि स्टेशनवर येण्यापूर्वी त्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे की नाही ते तपासावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, जेणेकरून भविष्यात रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होऊ शकेल.