आजच्या डिजीटल जमान्यात मोबाइल फोनद्वारेच मोठी काम होत आहेत. बँकिंग, शॉपिंग, पेमेंट्स आणि अन्य महत्वाची कामे अगदी घरबसल्या होऊन जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की मोबाइल द्वारे बिल पेड केल्यास त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर (Credit Score) होतो. मोबाइल बिल जर तुम्ही वेळेवर भरले नाही तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. हे काय गणित आहे थोडक्यात समजून घेऊ..
भारतात क्रेडिट कार्ड आणि कर्ज घेण्यासाठी अर्ज करतान क्रेडिट स्कोअर महत्वाचा आहे. अर्जदाराला लोन देताना वित्तीय संस्था संबंधित अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री चेक करतात. कर्ज मिळाल्यानंतर या कर्जाची परतफेड तसेच क्रेडिट कार्ड घेतले असेल तर या कार्डचा वापर क्रे़डिट स्कोअरचा महत्वाचा भाग ठरतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो. 700 पेक्षा जास्त स्कोअर चांगला मानला जातो.
तसं पाहिलं तर मोबाइल बिल क्रेडिट स्कोअरवर थेटपणे परिणाम करत नाही. जर तुमचे सिमकार्ड पोस्टपेड असेल. तर याचे बिल जर तुम्ही वेळेवर भरत नसाल तर टेलिकॉम कंपनी तुम्हाला डिफॉल्टच्या रुपात रिपोर्ट करते. नंतर हीच गोष्ट तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीत जोडली जाऊ शकते. जर असे घडले तर तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच खराब होऊ शकतो.
जर तुम्ही तुमच्या मोबाइलचे बिल वेळेवर भरले नाही आणि प्रकरण जर डिफॉल्ट होण्यापर्यंत पोहोचले तर अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपनी क्रेडिट ब्यूरोला रिपोर्ट करू शकते. यासाठी प्रिपेड प्लॅनच्या तुलनेत पोस्टपेड प्लॅनचे बिल तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकते.
जर तुम्ही मोबाइल बिल पेमेंट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले पण क्रेडिट कार्डचे बिल भरत नसाल तर याचाही तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चांगला क्रेडिट स्कोअर टिकवून ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड बिल आणि लोन ईएमआय वेळेवर भरत चला. मोबाइल बिलसाठी ऑटो पे किंवा रिमाइंडर सेट करुन ठेवा जेणेकरून बिल वेळेवर भरले जातील. जर बिलात काही त्रुटी असतील तर तत्काळ कंपनीशी संपर्क करा.