सध्या सगळीकडे लोकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण असलेले पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता देशवासियांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. वेगवेगळे कलाकार, खेळाडू व राजकारणी आपआपले मत मांडत असताना आता आणखी एक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाली आहे. सदर धमकी आयसिस काश्मीरकडून मिळाली असल्याचे समजत आहे. गंभीरने २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे, तसेच त्याला व त्याच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीर सध्या चालू असलेल्या आयपीएलमुळे टीम इंडियापासून ब्रेकवर आहे.
राहुलने घेतला संजीव गोयंका यांच्या ‘त्या’ कृतीचा बदला
तो नुकताच आपल्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. परंतु पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर त्याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यादरम्यान गौतम गंभीर पुन्हा एकदा त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसतील. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तथापि, भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका जून ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे. जर गंभीरचे लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला तयार करण्यावर आणि ती जिंकण्यावर नसेल, तर त्यांना नवीन वर्ल्ड कप टेबलमध्ये त्यांचे स्थान सुधारावे लागेल. गौतम गंभीरचा २०२७ च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून करार आहे. गंभीरने त्याच्या प्रशिक्षणाखाली एक आयसीसी जेतेपद जिंकले आहे.