School:मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात डेंगाचीमेट हायस्कूलने मारली बाजी

माय मराठी
2 Min Read

संदिप साळवे, जव्हार

महाराष्ट्रातील शाळांच्या (School) उन्नतीसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गेल्या दोन वर्षांपासून राबवित आहे.या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन २०२४ ते २५ या वर्षीचा मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा पुरस्कार जव्हार तालुक्यातील श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट हायस्कूलने बाजी मारत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.बुधवारी दुपारी १२ वाजता युनिव्हर्सल स्कूल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते ३ लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन शाळेला गौरविण्यात आले.

नव्वदच्या दशकात छोट्याश्या खोलीत स्थापन झालेल्या या शाळेने (School) अनेक प्रकारचे चढ-उतार पाहिले.नंतरच्या कालखंडात मुंबई येथील पै कुटुंबाने शाळेला मदतीचा हात देऊन जव्हार-डहाणू रस्त्यालगत मोकळ्या माळावर गांगोडा कुटुंबाच्या शेतजमिनीवर नव्या इमारतीची बांधणी करून शाळेने कात टाकायला सुरवात केली.
दरम्यान मध्यंतरीच्या कालखंडात या शाळेने अनेक तालुकास्तरीय स्पर्धेत आणि प्रदर्शनात सहभागी होऊन नामांकने पटकावली आहेत.विशेषतः नाचणी पीक आणि त्याचे गुणधर्म हा विषय हाती घेऊन विज्ञान प्रदर्शनात राज्य पातळीपर्यंत मजल मारली होती.

अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आणि ग्रामीण भागात स्थापित असलेल्या या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल देखील वाखण्याजोगा असाच राहिला आहे.अतिशय कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या या डेंगाचीमेट हायस्कूलने राज्य शासनाचा शैक्षणिक क्षेत्रातील मनाचा पुरस्कार पटकावल्याने शाळेवर आणि शाळेच्या शिक्षकावर चहूबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ह्या पुरस्कार सोहळा वितरण प्रसंगी जव्हार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे,शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा डांगे,पुंडलिक चौधरी,जव्हार तालुक्यातील जि.प शाळांचे केंद्रप्रमुख सह शिक्षक,डेंगाचीमेट हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेश मराड व सह शिक्षकांची उपस्थिती होती.

मिळालेला पुरस्कार हा माझे सहकारी शिक्षक, शाळेचे कर्मचारी,विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्या मेहनतीचा असून भविष्यात सर्वांच्या सहकार्याने शाळेचे नाव रोषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहूयात.
नरेश मराड, मुख्याध्यापक, श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more