Dombivli : कामगारांना गरजवंत कामगारांसाठी व लाभार्थ्यांसाठी मोठी बाब

माय मराठी
2 Min Read

डोंबिवली (Dombivli) ( शंकर जाधव)

–जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे
सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप

शहरातील महाराष्ट्र जनरल कामगार संघटना नाका कामगारांना शासकीय योजना माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते. कामगारांची सुरक्षितता आणि इतर योजनांची माहिती वेळोवेळी देवून त्यांच्यामध्ये जागरूकता आणत असते. गरजवंत कामगारांसाठी व लाभार्थ्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे असे वक्तव्य शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे डोंबिवलीत (Dombivli) केले.महाराष्ट्र जनरल कामगार संघटना माध्यमातून डोंबिवलीत नाका कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप उपक्रम पूर्वेकडील गांधीनगर येथील स्व. आनंद दिघे सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी लांडगे बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख महेश पाटील, उद्योजक विकी हिंगे, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, यादव ऑटोबाईलचे संभाजी यादव, काँगेसचे गणेश चौधरी, सिनेअभिनेत्री अक्षता दास, कामगार नेते संजय ठोंबरे, दिपेश दोशी, मंगेश मोरे, संदीप गव्हाणे, नगरसेवक पंढरीनाथ पाटील, संजय पावशे, डॉ.रमेश सुवर्णा, रेखा कांबळे, संजय पौळकर, आनंद नवसागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान लांडगे म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांचे काम लक्षवेधी आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्येक योजनांवर मिसाळ लक्ष ठेवून असतात. कामगारांची सुरक्षितता, त्यांच्या मुलींसाठी विवाह निधी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे मिळवून देण्यासाठी धडपड असते असेही लांडगे यांनी सांगितले.

तर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले की, नाका कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांतून दरवर्षी कामगारांना सेफ्टी किट, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये, जर मुले इंजिीअरिंगमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी ६० हजार रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये, कामगाराच्या काम करताना अपघात झाला तर त्यासाठी पाच लाख रुपये, तसेच ७५ टक्के अपंगत्व आले तर त्यासाठी दोन लाख रुपये अशा विविध सरकारी योजनांचा लाभ नाका कामगारांना मिळवून देण्यासाठी सांगताना सर्वपरी प्रयत्न करीत असते.

सदर संच वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, सचिव नामदेव भानुसे, खजिनदार रामचंद्र वाघ, पदाधिकारी गजानन डांगे, कमलाकर पाटील, चंद्रकांत गायकवाड, वंदना जाधव, रामेश्र्वर शेजुळ, समाधान धास, दीपक वाघ यांनी विशेष मेहनत घेतली.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more