(Dombivli) आमदार राजेश मोरेंचे मंत्री उदय सामंतांना पत्र
ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरुवार 8 तारखेला पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील नालेसफाईची पाहणी केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील एका नाल्यात रॅबिट टाकून भराव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. या माहिती मिळताच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ आमदार राजेश मोरे यांनी सदर ठिकाणी पाहणी करून नाराजी व्यक्त केली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एमआयडीसीचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार मोरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
वास्तविक पावसाळ्याच्या वर्क महिना अगोदर नाले सफाई होणे आवश्यक असते. मात्र अद्याप अजूनही काही नाले पूर्णपणे साफ झाले नाही. डोंबिवली एमआयडीसी परिसरात अद्यापही नाल्यांची सफाई झालेले नाही तर काही ठिकाणी नाल्यांची काम एमआयडीसी कडून हाती घेण्यात आली आहेत हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील नाल्यांमध्ये रॅबिट टाकून भराव टाकण्यात आला आहे. आमदार मोरे सदर ठिकाणची पाहणी केली.या पाहणी नंतर राजेश मोरे यांनी या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमदार राजेश मोरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवत एमआयडीसी कडून सुरू असलेले नाल्यांचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत , या कामांमुळे अद्यापही नालेसफाई करता आलेली नाही त्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाऊन लोकांना त्रास होऊ शकतो .
नाल्यांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी राजेश मोरे यांनी केली आहे. तर याबाबत केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाल्यात टाकण्यात आलेला भरावा काढण्याची सूचना दिली आहे. नाल्यांचे कामे हे लवकरात लवकर पूर्ण करावेत असे देखील एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचे सांगितले