डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील (Dombivli) इंदिरा चौकात रिक्षाचालक संतापले नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालक यांच्यावर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ) बुधवार 7 तारखेला सायंकाळच्या सुमारास डोंबिवलीत कारवाई सुरु होती. डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील इंदिरा चौकात आरटीओचे अधिकारी कारवाई करता आले असता कारवाईला विरोध करत संतापलेल्या रिक्षाचालकांनी त्यांची गाडी अडवली.
काही वेळ या ठिकाण वाहनाची लांब लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.रिक्षाचालकांनी कारवाई नको अशी भूमिका घेतली होती तर आरटीओ अधिकाऱ्यांनी मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
डोंबिवलीतील वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हे स्वतः रस्त्यावर उभे राहून वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देतात. तर डोंबिवली वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते.नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर बुधवारी आरटीओने डोंबिवलीतील कारवाई केली.
मात्र काही रिक्षाचालकांनी चक्क इंदिरा चौकात आरटीओची गाडीची रोखली. कारवाई करू नका, दंड आकारू नका, आमची जगायचे कसे?, आधीच कर्ज त्यात दंङ मग कस पोट भरणार असा प्रश्न रिक्षाचालकांनी यावेळी उपस्थित केला. मात्र नियम पाळा कारवाई होणार नाही असे आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना सांगितले.
याबाबत MH 05 वाहतूक प्रवासी संघटना संस्थापक अध्यक्षा वंदना सिंह सोनावणे म्हणाल्या, रिक्षाचालकांची दादागिरी व मुजोरीमुळे, प्रवासी कित्येक वर्ष त्रासलेले आहेत. आज तो त्रास आरटोओला झाला आहे त्यावरून डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेची थोडी कल्पना आली असावी.आम्ही नेहमी आरटीओ आणि प्रशासन कडे मागणी केली आहे की, कायदे आहेत तर त्यांची कडक अंमलबजावणी करा आणि यांना शिस्त लावा.
आम्हाला पर्यायी ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध करून द्या. EV बसची मागणी करत करत 8 वर्षात 50 EV रस्त्यावर आल्या पण आम्हाला दिसल्या नाहीत. 250 ची हमी होती आता 250 एक बस कधी येतील देव जाणे. तर जो पर्यंत कायद्यांची अमलबजावणी, पर्यायी ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध होणार नाही असे दिसते.
डोंबिवलीत परिस्थिती चिघळतच राहणार कधी प्रवाश्यांना त्रास तर कधी अधिकाऱ्यांना त्रास होणार. बरं सगळेच ऑटो वाले वाईट वागतात अस नाहीत पण जे वागतात त्या त्या रिक्षाचालकांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो.
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. डोंबिवली आरटीओची गाडी रिक्षाचालकांनी अडवली असली तरी कारवाई सूरूच होती. आरटीओकडून कारवाईत सातत्य राहील.